शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
2
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
3
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
4
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
5
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
6
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
7
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
8
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
9
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
10
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
11
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
12
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
13
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
14
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
15
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
16
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
17
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात
18
७१% चं रेकॉर्डब्रेकिंग इनक्रिमेंट! 'हे' आहेत भारतातील IT क्षेत्रातील सर्वाधिक कमाई करणारे CEO; मिळणार १५४ कोटी सॅलरी
19
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
20
वय वर्ष ८०, तरीही फिट! दिलीप प्रभावळकरांना स्वत:च्या फिटनेसचं आश्चर्य, म्हणाले- "एकदा ५ कुत्रे माझ्या लागले तेव्हा..."

जम्मू-काश्मीरमधील पोलिसांच्या हत्येमागे पाकिस्तानचाच हात; पुरावे समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2018 10:09 IST

पाकिस्तानमधून दहशतवाद्यांकडून मिळालेले मेसेज सुरक्षा दलांकडून इंटरसेप्ट

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील पोलिसांच्या हत्येमागे पाकिस्तानचा हात असल्याचे पुरावे भारतीय सुरक्षा दलांना मिळाले आहेत. पाकिस्तानची गुप्तहेर यंत्रणा असलेल्या आयएसआयच्या सूचनेवरुन दहशतवाद्यांनी जम्मू काश्मीरमधील तीन विशेष पोलीस अधिकाऱ्यांची हत्या केल्याचे पुरावे भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या हाती लागले आहेत. त्यामुळेच भारतानं संयुक्त राष्ट्राच्या महासभेतील पाकिस्तानी परराष्ट्र मंत्र्यांची भेट रद्द करण्याचा निर्णय घेतला. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज न्यूयॉर्कमध्ये पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मोहम्मद कुरेशी यांची भेट घेणार होत्या. मात्र जम्मू-काश्मीरमध्ये तीन पोलिसांची अपहरण करुन निर्घृण हत्या करण्यात आल्यानंतर भारतानं ही भेट रद्द केली. पाकिस्तानकडून येणारे मेसेज भारतीय सुरक्षा दलांनी इंटरसेप्ट केल्याचं वृत्त 'टाईम्स ऑफ इंडिया' या इंग्रजी वृत्तपत्रानं दिलं आहे. मेसेज इंटरसेप्ट करण्यात आल्यानंतरच सरकारकडून न्यूयॉर्कमधील भेट रद्द करण्यात आली. तीन दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी चौघांचं अपहरण केलं होतं. यामध्ये तीन पोलिसांचा समावेश होता. या तिन्ही पोलिसांची अतिशय निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. पोलिसांची हत्या करण्याचे आदेश सीमेपलीकडून देण्यात आले होते, असा दावा भारतीय सुरक्षा दलांनी केला आहे. हे मेसेज भारतीय सुरक्षा यंत्रणांनी इंटरसेप्ट केले आहेत. पाकिस्तानकडून येणारे मेसेज इतके स्पष्ट होते, की त्यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांच्या नावांचाही उल्लेख होता. सीमेपलीकडून आलेल्या मेसेजमधून तीन पोलीस अधिकाऱ्यांच्या हत्येच्या सूचना देण्यात आल्या. याशिवाय एका नागरिकाची सुटका करण्याचे आदेशदेखील दहशतवाद्यांना सीमेपलीकडून देण्यात आले. या संदेशांचा वेग अतिशय वेग अतिशय जास्त होता आणि यानंतर लगेचच दहशतवाद्यांकडून मेसेजमधून देण्यात आलेल्या सूचनांची अंमलबजावणी करण्यात आली. त्यामुळे दहशतवाद्यांचा कुटिल डाव हाणून पाडण्यासाठी सुरक्षा दलांना पुरेसा वेळ मिळाला नाही. दहशतवाद्यांना हत्या केलेले एसपीओ निसार अहमद, फिरदोस अहमद आणि कुलवंत सिंह यांचे मृतदेह एका बागेत मिळाले. तर एका एसपीओचा भाऊ असलेल्या फयाज अहमद भटला दहशतवाद्यांनी सोडून दिलं.  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादीTerrorismदहशतवादPakistanपाकिस्तान