्रपरिचर्चा जोड
By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:33+5:302015-02-18T00:13:33+5:30
चळवळ संपणार नाही

्रपरिचर्चा जोड
च वळ संपणार नाहीकॉ़ पानसरे यांनी सर्वसामान्यांसाठी लढा दिला़ कोल्हापुरात टोलविरोधी आंदोलनातही त्यांचा पुढाकार आहे़ जातीयवादाविरोधात त्यांनी सतत आवाज उठविला आहे़ त्यांचे हे काम विशिष्ट वर्गाला नको आहे़ यातूनच त्यांच्यावर हल्ला झाला असल्याचे वाटते़ चळवळीच्या माध्यमातून समाजासाठी काम करणारे कार्यकर्ते कुठलाही स्वार्थ न ठेवता काम करतात़ अशा कार्यकर्त्यांवर हल्ला करून कुणाला काय साध्य करावयाचे आहे हा मोठा प्रश्न आहे़ अशा हल्ल्यांनी मात्र, आवाज, विचार आणि चळवळ जराही कमी होणार नाही तर उलट ती आणखी वाढेल़ शासनाने या घटनेचा लवकरात लवकर शोध घेणे गरजेचे आहे़ ॲड़ कॉ़सुधीर टोकेकरविचारांची लढाई व्हावी विचारांची लढाई ही विचारांनीच लढली गेली पाहिजे़ जेव्हा समोरच्यांना विचारांच्या माध्यमातून उत्तर देण्याची ताकद नसते तेव्हा प्राणघातक हल्ले करण्याची मानसिकता तयार होते़ अशा हल्लेखोर प्रवृत्तींविरोधात सर्व समाजाने एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे़ अशा घटना घडल्यानंतर शासनाने यंत्रणा कामाला लावून आरोपींना तातडीने गजाआड करणे गरजेचे आहे मात्र, असे होत नाही़ त्यामुळे या लढाईची जबाबदारी समाजावरच येते़ कॉ़ शंकर न्यालपेल्लीश्रमिकांच्या नेत्यांवरच हल्ले होतात़ समाजातील काही प्रवृत्तींना त्यांच्या विरोधात विचार मांडले तर आपल्याला धोका आहे असा समज होत आहे़ या गैरसमजातूनच असे कृत्य होण्याचे प्रमाण वाढले आहे़ इतिहास पाहिला तर श्रमिकांसाठी काम करणार्या नेत्यांवरच हल्ले करून त्यांना संपविले आहे़ डॉ़ दाभोलकरांच्या हत्येनंतर परत अशी काही घटना घडेल असे वाटत नव्हते़ मात्र, दुर्दैवाने पुन्हा तशीच घटना घडली़ शासनाने आता तरी जागे होऊन या प्रतिगामी शक्तींचा नायनाट करणे गरजेचे आहे़ विठ्ठल बुलबुले, सामाजिक कार्यकर्तेदेशात लोकशाही व्यवस्था आहे़ प्रत्येकाला विचार व्यक्त करण्याचेही स्वातंत्र्य आहे़ मात्र, विचार व्यक्त करणार्यांवर प्राणघातक हल्ले होऊ लागल्याने या घटना व्यवस्थेने गांभीर्याने घेणे महत्त्वाचे आहे़ शासन कुणाचेही असो अशा प्रवृत्तींना वेळीच थांबविणे समाजहिताच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे़ हल्ला करून सुरू केलेले काम थांबत नसते़ समाजातील सर्व घटकांना सुरक्षितता निर्माण होईल, यासाठी काम करणे गरजेचे आहे़ प्रा़ भानुदास बेरड