शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

हवाईदलाच्या तळांवर हल्ला करण्याचा दहशतवाद्यांचा कट; श्रीनगरमध्ये हायअलर्ट  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2019 10:04 IST

हवाई दलाच्या श्रीनगर आणि अवंतीपुरा बेसकॅप्म दहशतवादी हल्ला करण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणताही धोका न पत्करता सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली आहेत. 

श्रीनगर - जम्मू काश्मीरमधील काही भागामध्ये दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. श्रीनगरमध्ये दहशतवाद पसरविण्यासाठी दहशतवाद्यांकडून षडयंत्र रचलं जात असल्याची माहिती हाती लागली आहे. सरकारी सूत्रांनुसार काश्मीरमधील श्रीनगर आणि अवंतीपुरा या एअरबेसवर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता दिली आहे. गुप्तचर यंत्रणेच्या माहितीमुळे सुरक्षा यंत्रणांनी काश्मीर खोऱ्यात हायअलर्ट जारी केलेला आहे. 

सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार मागील काही दिवसांपासून काश्मीर खोऱ्यात दहशतवादी हल्ला करण्याचं षडयंत्र रचत आहे. हवाई दलाच्या श्रीनगर आणि अवंतीपुरा बेसकॅप्म दहशतवादी हल्ला करण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणताही धोका न पत्करता सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली आहेत. 

अनेक दिवसांपासून काश्मीरमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमकी होत आहेत. त्यामुळे फक्त सीमेच्या पलीकडे नाही तर घाटीमध्येही काही दहशतवादी लपून बसल्याचं सांगितलं जात आहे. गुरुवारी पुलवामा येथे दहशतवादी आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये भीषण चकमक झाली. त्यामध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा जवानांना यश आले मात्र या चकमकीत एक जवान शहीददेखील झाला. काश्मीरमध्ये दहशतवाद संपविण्यासाठी भारतीय जवानांकडून ऑपरेशन ऑलआउट सुरु करण्यात आलं आहे. या ऑपरेशनमुळे या वर्षीच्या सुरुवातीपासून अनेक दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे. 

Jammu And Kashmir : पुलवामा चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवान शहीद

बुरहान वानीचा चकमकीत खात्मा सुरक्षा रक्षकांनी 8 जुलै 2016 मध्ये चकमकीत बुरहान वानी याचा खात्मा केला होता. बुरहानचा खात्मा केल्यानंतर काश्मीर खोऱ्यात तणावाचे वातावरण होते. तेव्हापासून आतापर्यंतच्या हिंसाचारात शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. हिज्बुल या दहशतवादी संघटनेचा मोस्ट वॉन्टेड असलेला बुरहान वानी हा येथील युवकांसाठी सोशल मीडियावर फेमस होता. काही महिन्यांपूर्वी स्थानिक लोकांना विचारले असता त्याला 'भारतीय एजेंट' असल्याचे सांगत. मात्र, सुरक्षा यंत्राणांसाठी बुरहान वाणी हा मीडियाने तयार केलेला कागदी वाघ होता. पुलवामामधील त्राल परिसरात जन्म झालेला बुरहान वानी वयाच्या 15 व्या वर्षी दहशतवादी बनला होता. 22 व्या वर्षी सुरक्षा रक्षकांनी त्याचा खात्मा केला. बुरहान वानीच्या खात्माआधी काश्मीर खोऱ्यात जैश-ए-मोहम्मद या  दहशतवादी संघटनेचा नायनाट होण्यास आला होता. मात्र, गेल्या तीन वर्षात पुन्हा जैश-ए-मोहम्मदने डोके वर काढले आहे. काश्मीर खोऱ्यात शेकडो बुरहान वानी तयार करण्याचा उद्देश जैश-ए-मोहम्मद संघटनेचा आहे.  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerror Attackदहशतवादी हल्लाIndian Armyभारतीय जवानairforceहवाईदल