शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

RSS कार्यालय अन् हिंदू नेते दहशतवाद्यांच्या निशाण्यावर; गुप्तचर यंत्रणेचा खळबळजनक दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2020 16:16 IST

येत्या काही दिवसात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यालय, पोलीस स्टेशन, काही नेते हे आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहेत.

नवी दिल्ली - नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसीवरुन देशभरात विविध भागात आंदोलन सुरु आहे. अशातच गुप्तचर यंत्रणेच्या माहितीनुसार जागतिक दहशतवादी संघटनेकडून आरएसएसचं कार्यालय आणि त्यांचे नेते यांना निशाणा बनवण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी आयईडी आणि कारमधून बॉम्बस्फोट घडवण्याचा कट आखला जात असल्याचं सांगण्यात येत आहे. 

पंजाब, महाराष्ट्र आणि राजस्थान या भागात हा हल्ला होऊ शकतो असा दावा करण्यात आला आहे. येत्या काही दिवसात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यालय, पोलीस स्टेशन, काही नेते हे आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहेत. त्यांच्यावर आयईडीचा वापर करुन हल्ला होऊ शकतो. त्यामुळे आवश्यक ती सुरक्षेची खबरदारी राज्यांनी घ्यावी अशी सूचना गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. उच्चस्तरीय अधिकाऱ्यांकडून सुरक्षेचा आढावा घेण्यात येत आहे. यामध्ये महाराष्ट्र, दिल्ली, पंजाब, राजस्थान, यूपी आणि आसाम याठिकाणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सुरक्षेचा आढावा घेण्यात येत आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. 

मागच्या महिन्यात बंगळुरु पोलिसांकडून ६ आरोपींना अटक करण्यात आलं. सीएए समर्थनार्थ काढलेल्या रॅलीमध्ये आरएसएस नेत्याची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. २२ डिसेंबरला बंगळुरुमध्ये काढण्यात आलेल्या रॅलीत आरएसएस नेते वरुण बोपाला यांच्यावर हल्ला करण्यात आला त्यामध्ये ते बचावले. या हल्ल्यातील ६ जणांना पकडण्यात पोलिसांना यश आलं होतं. त्यावेळी बंगळुरुचे पोलीस आयुक्त भास्कर राव यांनी सांगितले होते की, अटक केलेल्या ६ आरोपींच्या चौकशीत ते लोक मोठं षडयंत्र रचत असल्याची माहिती मिळाली. सीएए समर्थनार्थ रॅलीत हिंसाचार पसरवणे आणि हिंदू नेते त्यांच्या निशाण्यावर आहेत. यात पकडलेल्या आरोपींची नावे मोहम्मद इरफान, सैय्यद अकबर, सैय्यद सिद्दिक अकबर, अकबर बाशा, सनउल्ला शरीफ आणि सादिक उल अमीन अशी आहेत.     

दरम्यान बंगळुरु पोलिसांनी पकडलेल्या आरोपींच्या निशाण्यावर कोण कोण हायप्रोफाईल नेते आहेत. कोणाला निशाणा बनवणार आहे याबाबत कोणतीही माहिती उघड केली नाही. मात्र गुप्तचर यंत्रणेने दिलेली माहिती आणि बंगळुरु येथे घडलेल्या घटनेवरुन आरएसएस आणि हिंदू नेते दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असल्याने सर्व पोलीस दलाला अलर्ट करण्यात आलं आहे. 

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघterroristदहशतवादीHinduहिंदूcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकPoliceपोलिस