जिल्ह्यातील तीन लाख शेतकर्यांना विमा कवच संरक्षण : स्व.गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना
By Admin | Updated: February 19, 2016 00:24 IST2016-02-19T00:24:12+5:302016-02-19T00:24:12+5:30
जळगाव- राज्य शासनामार्फत शेतकर्यांसाठी स्व.गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना लागू करण्यात येत आहे. या योजनेतंर्गत अपघाती मृत्यू झाल्यास दोन लाखापर्यंत मदत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील तीन लाख खातेदारांना लाभ होणार आहे.

जिल्ह्यातील तीन लाख शेतकर्यांना विमा कवच संरक्षण : स्व.गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना
ज गाव- राज्य शासनामार्फत शेतकर्यांसाठी स्व.गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना लागू करण्यात येत आहे. या योजनेतंर्गत अपघाती मृत्यू झाल्यास दोन लाखापर्यंत मदत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील तीन लाख खातेदारांना लाभ होणार आहे.शेती व्यवसायात काम करताना शेतकर्याच्या अपघाती मृत्यू अथवा अपंगत्व यासाठी विमा संरक्षण, महाराष्ट्र राज्यातील १० ते ७५ वयोगटातील सातबारा वर शेतकरी म्हणून नोंद झालेला प्रत्येक शेतकर्यांना विमा संरक्षण देण्यात आले आहे. विमा संरक्षण कालावधी १ डिसेंबर २०१५ ते ३० नोव्हेंबर २०१६ विमा संरक्षण कालावधी संपल्यापासून ९० दिवसांत तालुका कृषि अधिकारी यांचेकडे पूर्ण प्रस्ताव दाखल करणे आवश्यक आहे. इन्फोअपघातानुसार वेगवेगळी भरपाईअपघाती मृत्यू आल्यास दोन लाख, अपघातामुळे दोन्ही डोळेे निकामी झाल्यास दोन लाख रुपये, अपघातामुळे दोन अवयव निकामी झाल्यास २ लाख रुपये अपघातामुळे एक डोळा एक अवयव निकामी झाल्यास दोन लाख रुपये अपघातामुळे एक डोळा निकामी झाल्यास एक लाख, अपघातामुळे एक अवयव निकामी झाल्यास एक लाख रुपये मिळणार आहे.