आवश्यक तेथे गतिरोधक बसविण्याचे निर्देश

By Admin | Updated: December 20, 2014 22:28 IST2014-12-20T22:28:17+5:302014-12-20T22:28:17+5:30

मुंबई : मुंबई शहर व उपनगरातील विविध शाळा, रुग्णालये, धार्मिक स्थळे तसेच महाविद्यालय या वर्दळीच्या ठिकाणी वाहनांच्या वेगावर नियंत्रण राहण्यासाठी आवश्यक तेथे गतिरोधक असणे आवश्यक असून पालिका प्रशासनाने याचा विशेष अभ्यास करून आवश्यक तेथे गतिरोधक बसविण्याची कार्यवाही त्वरित करण्याचे निर्देश महापौर स्नेहल आंबेकर यांनी महापालिका प्रशासनाला दिले.

Instructions for locating motion wherever necessary | आवश्यक तेथे गतिरोधक बसविण्याचे निर्देश

आवश्यक तेथे गतिरोधक बसविण्याचे निर्देश

ंबई : मुंबई शहर व उपनगरातील विविध शाळा, रुग्णालये, धार्मिक स्थळे तसेच महाविद्यालय या वर्दळीच्या ठिकाणी वाहनांच्या वेगावर नियंत्रण राहण्यासाठी आवश्यक तेथे गतिरोधक असणे आवश्यक असून पालिका प्रशासनाने याचा विशेष अभ्यास करून आवश्यक तेथे गतिरोधक बसविण्याची कार्यवाही त्वरित करण्याचे निर्देश महापौर स्नेहल आंबेकर यांनी महापालिका प्रशासनाला दिले.
महापौरांनी स्थायी समिती सभागृहात प्रथमच प्रभाग समिती समस्या निवारण व समन्वय समितीच्या सदस्यांची संयुक्त बैठक घेतली. महापौरांनी प्रथम विविध प्रभागांतून आलेल्या पत्रानुरूप कार्याचा आढावा घेतला. मुंबईत विशेषत: शाळा, रुग्णालये, धार्मिक स्थळे तसेच महाविद्यालय अशा ठिकाणी दुचाकी चालक व रिक्षा चालक यांच्या वाहनांवर नियंत्रण आणण्यासाठी अशा ठिकाणी गतीरोधक बसविण्याची मागणी नगरसेवकांनी केली होती. या मागणीनुरूप महापालिकेच्या प्रशासनाकडून पोलिस खात्याच्या वाहतूक विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात येतो. या प्रस्तावाची तात्काळ अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीकोनातून प्रशासनाने पाठपुरावा करण्याचे निर्देशही महापौरांनी प्रशासनाला दिले. तसेच या संदर्भात काही धोरणात्मक निर्णय घेण्यासंदर्भात प्रशासनाला आदेश देण्यात आले. यासोबतच झाडांच्या छाटलेल्या फांद्यांचा कचरा उचलण्याच्या बाबतीत प्रशासनाकडून नगरसेवकांना विविध कारणे सांगितली जातात. या संदर्भात प्रशासनाकडून सांगण्यात आले की, मागील वषार्पासून प्रत्येक विभागात यासाठी स्वतंत्र यंत्रणा करण्यात आलेली होती. २४ तासांच्या आत पडलेली झाडे व या अनुषंगाने अन्य बाबी तात्काळ कार्यवाही करण्यात आली होती. यापुढे ही प्रक्रिया चालू राहणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. शहरातील विविध ठिकाणी उंच खांब्यावरील दिवे (हाय मास्ट)उभारण्यासंदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्याच्या दृष्टीने एक समिती गठीत करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. प्रभाग समितीत उपस्थित केलेले हरकतीच्या मुद्यानुरूप मुदतीत उत्तरे प्राप्त करण्याच्या अनुषंगाने प्रशासनाने कार्यवाही करावी, अशा स्वरुपाचे निर्देश आंबेकर यांनी प्रशासनाला दिले.
दरम्यान, या बैठकीस उप महापौर अलका केरकर, स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे, शिक्षण समिती अध्यक्ष विनोद शेलार यांच्यासह प्रभाग समित्यांचे अध्यक्ष उपस्थित होते. तसेच महापालिका आयुक्त सीताराम कुंटे, अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) राजीव जलोटा, अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगर) एस.व्ही.आर. श्रीनिवास, अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) विकास खारगे, अतिरिक्त महापालिका आयुक्त (पि›म उपनगर) संजय देशमुख व महापालिकेचे संबंधीत विभागाचे अधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.
..........................

Web Title: Instructions for locating motion wherever necessary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.