शहरं
Join us  
Trending Stories
1
गोविंदा आला रे...! सरकार संरक्षण देणार; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार...
2
माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा अत्याचार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षेची घोषणा
3
कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती; छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
4
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
5
ओव्हल कसोटीत टीम इंडियाकडून झाली मोठी चूक, ठरू शकते पराभवाचं कारण  
6
UPI New Rule: आजपासून लागू झाले यूपीआयचे नवे नियम; सारखं सारखं करता येणार नाही 'हे' काम
7
दीड वर्षांचा लेक, महिन्याभरापूर्वी प्रमोशन; लेफ्टनंट कर्नल भानू प्रताप शहीद, दगड पडले अन्...
8
'निवृत्त व्हा, कुठेही जा...तुम्हाला सोडणार नाही', राहुल गांधींचा थेट इशारा; कुणावर संतापले?
9
दहावीतील गुणांवरून नातेवाईकांनी उडवली होती खिल्ली, आता तरुणाने बँकेचा SMS दाखवला; आकडा पाहून 'बोलती बंद'
10
कोल्हापूरकरांच्या विरोधाची धग अंबानीपर्यंत पोहोचली; वनताराचे पथक नांदणीत येणार
11
"मोहन भागवत यांना पकडण्याचे आदेश होते"; मालेगाव स्फोट प्रकरणी माजी ATS अधिकाऱ्याचा दावा
12
Video: खऱ्याखुऱ्या पोलिस काकांना पहिल्यांदाच पाहून चिमुकली भलतीच खुश, म्हणाली 'हाय फाईव्ह...'
13
कियारा अडवाणीसाठी आणण्यात आला स्पेशल केक, लेकीसोबत साजरा केला वाढदिवस; म्हणाली...
14
पंचायत निवडणुकीत उतरले सोशल मीडिया इन्फ्लुएंसर; लाखो फॉलोअर्स पण पडलेली मते एकदा पाहाच
15
जागतिक अस्थिरता असतानाही सोने-चांदी स्वस्त! गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी? भविष्यात काय होणार?
16
PNB Housing Finance ला मोठा झटका, वरिष्ठांच्या राजीनाम्यानंतर शेअर १६% नं आपटला; लागलं लोअर सर्किट
17
चोर तर चोर वर शिरजोर! दागिन्यांच्या दुकानातून अंगठी चोरली, पोलिसांनी पकडल्यावर गुंडगिरी
18
सॅमसंगचे स्मार्ट टीव्ही बंद पडले, ग्राहक ठणाठणा ओरडू लागले; सर्व्हर डाऊनचे मेसेज दिसू लागले...
19
Pune Crime: कोयता काढला अन् सपासप वार करत सुटला; बारामती-इंदापूर धावत्या बसमध्ये प्रवाशावर हल्ला
20
Video: अश्विनी भावेंच्या अमेरिकेतील घरी अवतरली मराठी सिनेसृष्टी, अभिनेत्रीचा आनंद गगनात मावेना

दहशतवाद्यांचे टार्गेट काश्मीरऐवजी जम्मू, पर्यटकांत भीती निर्माण करण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2024 06:58 IST

Terrorists Target Jammu: काश्मीर, पंजाबमधून येणाऱ्या दहशतवाद्यांच्या तावडीत अडकलेल्या जम्मूतील नागरिकांच्या चिंतेत वाढत्या दहशतवादामुळे भर पडली आहे. तीर्थक्षेत्र वैष्णोदेवी आणि जम्मू विभागात येणाऱ्या पर्यटकांना आणि भाविकांमध्ये दहशत पसरवून जम्मूचे आर्थिक कंबरडे मोडण्याचा दहशतवाद्यांचा डाव स्पष्ट दिसत आहे.

- सुरेश एस. डुग्गरजम्मू - काश्मीर, पंजाबमधून येणाऱ्या दहशतवाद्यांच्या तावडीत अडकलेल्या जम्मूतील नागरिकांच्या चिंतेत वाढत्या दहशतवादामुळे भर पडली आहे. तीर्थक्षेत्र वैष्णोदेवी आणि जम्मू विभागात येणाऱ्या पर्यटकांना आणि भाविकांमध्ये दहशत पसरवून जम्मूचे आर्थिक कंबरडे मोडण्याचा दहशतवाद्यांचा डाव स्पष्ट दिसत आहे.

अशा परिस्थितीत १५ दिवसांनी सुरू होणाऱ्या अमरनाथ यात्रेची सर्वांत मोठी चिंता आहे. गेल्या पाच दिवसांपासून सुरक्षा दल जम्मू विभागातील अनेक भागांत दहशतवाद्यांशी लढत आहे आणि इतर भागात दहशतवादी घुसल्याच्या अफवा पसरत आहेत. दोन आत्मघाती दहशतवादी मारले गेले असले तरी डझनभरांच्या शोधात अद्याप काहीही निष्पन्न झालेले नाही. पोलिसांचे इशारे आणि कधीही कुठेही आत्मघातकी हल्ले होण्याची भीती यामुळे जम्मूच्या अर्थव्यवस्थेला खिंडार पडू लागले हे निश्चित.

नेमके काय केलेताजे हल्ले राष्ट्रीय महामार्गापासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर झाले, ते लोकांना घाबरविण्यासाठी पुरेसे ठरले. लष्कराला लोकांच्या मनात घुसलेली भीती दूर करण्यात सध्या तरी यश आलेले नाही.

सर्वांत मोठी समस्या...सुरक्षा दलांसाठी सर्वात मोठी समस्या ही आहे की दहशतवादी 'स्लीपर सेल' आणि कार्यकर्ते बनून हल्ले करत आहेत. त्यांच्यावर कारवाईही होत आहे, परंतु तोपर्यंत ते शांतता भंग करण्यात तसेच अर्थव्यवस्था नष्ट करण्यात यशस्वी ठरत आहेत. सीमा भागात स्थलांतरित नागरिक आणि भाडेकरूंची माहिती लपविल्यामुळे अडचणी वाढल्या आहेत, कारण त्यांच्यापैकी बरेच जण दहशतवाद्यांचे समर्थक असल्याचे सिद्ध झाले आहे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerror Attackदहशतवादी हल्लाTerrorismदहशतवादIndian Armyभारतीय जवानCentral Governmentकेंद्र सरकार