शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
4
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
5
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
6
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
7
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
8
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
9
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
10
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
11
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
12
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
13
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
14
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
15
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
16
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
17
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
18
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
19
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
20
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?

घरातून काम करणाऱ्यांना निद्रानाश, पाठदुखीचा त्रास

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2020 04:24 IST

अनेक तास काम करणाऱ्यांपैकी अनेकांना निद्रानाश, पाठदुखी, बैचैनी, तणाव आदी समस्यांचा सामना करावा लागत आहे. शरीराची हालचाल कमी झाल्याने वजनही वाढले आहे.

नवी दिल्ली : लॉकडाऊनच्या काळात घरातून काम अर्थात वर्क फ्रॉम होम (डब्ल्यूएफएच)चा पर्याय अनेकांनी स्वीकारला असला तरी अनेक तास काम करणाऱ्यांपैकी अनेकांना निद्रानाश, पाठदुखी, बैचैनी, तणाव आदी समस्यांचा सामना करावा लागत आहे. शरीराची हालचाल कमी झाल्याने वजनही वाढले आहे.लॉकडाऊनचा सध्या पाचवा आठवडा सुरू आहे. २५ मार्च रोजी लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर तो १४ एप्रिलला मध्यरात्री संपणार होता; पण त्याला केंद्र सरकारने ३ मेपर्यंत मुदतवाढ दिली. देशातील कोरोना विषाणूची साथ पूर्णपणे आटोक्यात आलेली नसल्याने लॉकडाऊनला ३ मेनंतर पुन्हा मुदतवाढ मिळण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे.लॉकडाऊनमध्ये सर्व कंपन्यांनी आपली कार्यालये बंद ठेवली असून त्यांचे कर्मचारी घरूनच काम करत आहेत. दिल्लीतील एका आयटी कंपनीतल्या कर्मचाºयाने सांगितले की, दिवसभरातील अनेक तास मी लॅपटॉपवर काम करत असतो. तसेच मोबाइलवर कामाबद्दल बोलणे सुरू असते.घरून काम करायला लागलो तेव्हा प्रारंभीच्या दिवसांत ती कार्यशैली मला आवडली होती. मात्र दिवस उलटू लागले तसतसे त्यातील उणिवा जाणवू लागल्या. घरातून काम करताना माझा संबंध फक्त इंटरनेटशीच येतो.कार्यालयातून काम करताना अनेकदा सहकाºयांशी तेथील बैठकांमध्ये चर्चा व्हायच्या. आजूबाजूला खूप माणसे असायची. घरातून काम करताना, अनेक तास लॅपटॉप, मोबाइल स्क्रीनकडे पाहावे लागत असल्याने डोकेदुखीचे प्रमाण वाढले आहे. सतत बैठ्या कामामुळे पाठ दुखते.।नियमित व्यायाम करण्याचा सल्लादेशभरातील आयटी कंपन्यांच्या एकूण कर्मचाºयांपैकी ९० ते ९५ टक्के लोक लॉकडाऊनच्या काळात घरूनच काम करत आहेत. तासन् तास बसून काम केल्याने आरोग्याचे प्रश्न उद्भवू नये व शारीरिक हालचाल व्हावी, याकरिता रोज विविध प्रकारचे व्यायाम रोज करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून या दिला जात आहे. तसेच ध्यानधारणा करण्यासही सुचविण्यात आले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस