शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकच्या 'असंवेदनशील' मंत्र्यांनी पूरग्रस्तांच्या दिशेने फेकले बिस्किटांचे पुडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2018 11:28 IST

रेवण्णा यांनी किमान सौजन्य दाखवायला हवे होते, ते आपल्या कुटुंबीयांनाही असेच वागवतील का असा प्रश्न काही लोकांनी समाजमाध्यमांमध्ये विचारला आहे.

बंगळुरू- कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांचे बंधू आणि मंत्री एच. डी. रेवण्णा नव्या वादात सापडले आहेत. पूरग्रस्तांना मदतकार्य करण्याच्या नावाखाली त्यांच्या अंगावर बिस्किटांचे पुडे फेकण्याचा प्रकार त्यांनी केला आहे. कर्नाटकच्या हसन जिल्ह्यातील आश्रयछावणीमध्ये ही घटना घडली आहे. त्यामुळे रेवण्णा यांच्यावर विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. रेवण्णा 'असंवेदनशील' असल्याची टीका त्यांच्यावर होत आहे.एच.डी. रेवण्णा हसन जिल्ह्यामध्ये पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी गेले होते. यावेळेस बिस्किटांचे पुडे लोकांच्या हातामध्ये देणे शक्य असूनही ते त्यांच्या दिशेने फेकत असल्याचे व्हीडिओमध्ये दिसत आहे. हा व्हीडिओ प्रसिद्ध झाल्यानंतर रेवण्णा यांनी किमान संवेदनांचे भान राखत वागायला हवे होते अशा भावना व्यक्त होत आहेत. रेवण्णा यांच्याबरोबर अर्कालगुडुचे मदार एटी रामस्वामीसुद्धा उपस्थित होते.

भाजपाचे नेते एस, सुरेश कुमार यांनी रेवण्णा यांच्यावर टीका करताना, प्रिय सार्वजनिक बांधकाम मंत्री, पूरग्रस्तांवर बिस्किटे फेकणे म्हणजे सार्वजनिक काम नव्हे. तुमची वाढलेली आत्मप्रौढी आणि अयोग्य वर्तन हेच बिस्किटे फेकण्याचे कारण आहे का? असा प्रश्न रेवण्णा यांना विचारला आहे.रेवण्णा यांनी किमान सौजन्य दाखवायला हवे होते, ते आपल्या कुटुंबीयांनाही असेच वागवतील का असा प्रश्न काही लोकांनी समाजमाध्यमांमध्ये विचारला आहे.रेवण्णा यांच्या मदतीला त्यांचे भाऊ व मुख्यमंत्री कुमारस्वामी धावून आले आहेत. रेवण्णा यांनी आपल्या वर्तनातून कोणताही उद्धटपणा प्रदर्शित केलेला नाही. तेथे लोकांची फारच गर्दी होती त्यामुळे हालचाल करण्यास जागा नव्हती असे स्पष्टीकरण कुमारस्वामी यांनी केले आहे. रेवण्णा यांचे पूत्र प्रज्ज्वल रेवण्णा यांनीही आपल्या वडिलांची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला असून आपले वडिल विनम्र आहेत आणि त्यांना पूरग्रस्तांची मदत करायची होती असे म्हटले आहे.

टॅग्स :Karnatakकर्नाटकKarnatak Politicsकर्नाटक राजकारणkumarswamyकुमारस्वामीJanata Dal (Secular)जनता दल (सेक्युलर)