शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

जाणून घ्या मोदींच्या दाव्यातील तथ्य; INS विराटचा वापर राजीव गांधींनी कधी आणि केव्हा केला होता?  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2019 10:24 IST

राजीव गांधी आणि त्यांच्या कुटुंबाला त्यांच्या सुट्यांसाठी एका बेटावर घेऊन जाण्यासाठी विराटला पाठवले गेले होते. एवढे काय त्यांच्या सासरवाडीचेही लोक आयएनएस विराटवर होते. हा प्रकार राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड करणारा नव्हता का?

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या प्रचार अंतिम टप्प्यात आलेला असताना भाजपा आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे वातावरण तापू लागलंय. रामलीला मैदानावर भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर पुन्हा एकदा निशाणा साधला. यामध्ये बोलताना मोदी यांनी राजीव गांधी यांना पुन्हा लक्ष्य केले. जे लोक आज सांगत आहेत की, सेना कोणाची जहागीर नाही त्याच कुटुंबीयांनी आयएनएस विराट या युद्धनौकेचा वापर खाजगी सुट्ट्यांसाठी केला होता असा आरोप नरेंद्र मोदी यांनी केला. 

आयएनएस विराटला सागरी सीमांच्या रक्षणासाठी तैनात केले गेले आहे. राजीव गांधी आणि त्यांच्या कुटुंबाला त्यांच्या सुट्यांसाठी एका बेटावर घेऊन जाण्यासाठी विराटला पाठवले गेले होते. एवढे काय त्यांच्या सासरवाडीचेही लोक आयएनएस विराटवर होते. हा प्रकार राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड करणारा नव्हता का? असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित केला. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या सुट्ट्यांचा उल्लेख करत काँग्रेसवर टीका केली त्याबाबत एका हिंदी न्यूज चॅनेलने एक बातमी प्रसारीत केली आहे. ज्यामध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी आयएनएस विराटचा वापर कुटुंब आणि मित्रांसोबत सुट्टी घालविण्यासाठी केला होता. त्यावेळीही राजीव गांधी यांना विरोधकांच्या टीकेला सामोरं जावं लागलं होतं. 

राजीव गांधींनी नौदलाचे जहाज कुटुंबाला फिरण्यासाठी वापरले होते

कधी साजरी केली सुट्टी?इंडिया टूडे या चॅनेलच्या बातमीनुसार तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी 1987 मध्ये नवीन वर्ष साजरं करण्यासाठी गांधी कुटुंब आणि काही खास मित्रांसोबत एका बेटावर सुट्टी साजरी करण्यासाठी गेले होते. त्याठिकाणी 10 दिवस ते राहिले होते. 

सुट्टी साजरी करण्यासाठी कोणत्या ठिकाणी गेले होते?लक्षद्वीप येथील सुंदर असं बंगाराम बेटावर राजीव गांधी, त्यांचे कुटुंब आणि मित्रपरिवार सुट्टी एन्जॉय करायला गेले होते. बंगाराम बेट हे अतिशय सुंदर आणि अप्रतिम बेट आहे. 

गांधी परिवारासोबत कोण कोण होतं?राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांच्यासोबत या पर्यटनात राहुल आणि प्रियंका गांधी यांचे मित्र, सोनिया गांधी यांची बहीण तसेच कुटुंब, सोनिया गांधी यांची आई, भाऊ आणि मामा सहभागी होते. तसेच राजीव गांधी यांचे मित्र अमिताभ बच्चन, त्यांच्या पत्नी जया बच्चन आणि तीन मुलंहीसोबत होती. तीन मुलांमध्ये अमिताभ यांचे भाऊ अजिताभ यांच्या मुलीचाही समावेश होता. 

गोपनीय दौरा मिडीयात उघड झालागांधी कुटुंबीयांचा हा दौरा प्रचंड गोपनीय ठेवण्यात आला होता. मात्र तरीही ही बातमी माध्यमांसमोर आली. त्यानंतर अनेक विवाद झाले. राजीव गांधी यांच्यावर विरोधकांनी प्रचंड टीका केली.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRajiv Gandhiराजीव गांधीAmitabh Bachchanअमिताभ बच्चनRahul Gandhiराहुल गांधी