शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

INS Vikrant launching: 'काँग्रेसने सुरुवात केली, मोदींनी श्रेय घेतलं'; जयराम रमेश यांनी शेअर केला 9 वर्षे जुना व्हिडिओ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2022 19:04 IST

INS Vikrant launching: INS विक्रांतची सुरुवात काँग्रेस काळात झाली, पण मोदी श्रेय घेत आहेत, असा आरोप जयराम रमेश यांनी केला आहे.

Politics over INS Vikrant: कोचीमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'INS विक्रांत' नौदलाला समर्पित केली. पंतप्रधान मोदींनी यावेळी नौदलाचा नवीन लोगोही लॉन्च केला. INS विक्रांतमुळे नौदलाची ताकद अनेक पटींनी वाढणार आहे. पण, आता यावरुन राजकारण सुरू झाले आहे. भारताचे पहिले स्वदेशी बनावटीचे जहाज राष्ट्राला समर्पित करण्याचे श्रेय घेतल्याबद्दल काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आणि आधीच्या सरकारांच्या योगदानाला योग्य स्थान न दिल्याचा आरोपदेखील केला. 

काँग्रेसने शेअर केला जुना व्हिडिओकाँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी माजी संरक्षण मंत्री एके अँटनी यांनी ऑगस्ट 2013 मध्ये INS विक्रांतचे उद्घाटन करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. जयराम रमेश म्हणाले की, 'नरेंद्र मोदी सत्तेवर आहेत, म्हणूनच ही विमानवाहू युद्धनौका देशाला समर्पित करत आहेत. मोदी सरकारचा याच्याशी काही संबंध नाही. मोदी सरकार सत्तेवर असताना याचा नौदलात समावेश केला जातोय. पण, 12.8.2013 रोजी तत्कालिन संरक्षणमंत्री एके अँटनी यांनी INS विक्रांत लाँच केली होती. डिझाईनपासून निर्मिती आणि लॉन्च होण्यापर्यंत 22 वर्षे लागली आहेत. मोदी सरकारने आता त्याचा नौदलात समावेश केला आणि त्याचे श्रेय घेत आहे,' असा आरोप त्यांनी केला.पूर्वीच्या सरकारांचेही योगदानते पुढे म्हणाले, 'या जहाजामुळे देशाची ताकद वाढणार आहे. पण, पंतप्रधान मोदींनी यापूर्वीच्या सरकारांच्या योगदानाला योग्य स्थान दिले नाही. भारताची पहिली स्वदेशी बनावटीची विमानवाहू युद्धनौका INS विक्रांत देशाला समर्पित करणे हे 1999 पासून सर्व सरकारांच्या एकत्रित प्रयत्नांचे परिणाम आहेत. पंतप्रधान मोदी हे मान्य करतील का? आधीची INS विक्रांत ब्रिटनकडून मिळवण्यातही काँग्रेस नेते कृष्ण मेनन यांचाच मोठा वाटा होता', असेही ते म्हणाले.

भारताचे मोठे यश...आज पंतप्रधानांच्या हस्ते कोचीमध्ये 'INS विक्रांत' नौदलाच्या स्वाधिन करण्यात आली. यामुळे आता भारत अशा निवडक देशांच्या यादीत सामील झाला आहे, ज्यांच्याकडे स्वतःची एवढी मोठी युद्धनौका तयार क्षमता आहे. एकूण 262 मीटर लांब आणि 62 मीटर रुंद हे जहाज 28 नॉटिकल मैल ते 7500 नॉटिकल मैल अंतर पार करू शकते. 20,000 कोटी रुपये खर्चून बांधलेली ही विमानवाहू युद्धनौका अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे. स्वदेशी बनावटीच्या 'अ‍ॅडव्हान्स लाइट हेलिकॉप्टर' (ALH) व्यतिरिक्त मिग-29K फायटरसह 30 विमाने चालवण्याची क्षमता यात आहे. 

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी