आयएनएस सिंधुरत्न अग्निकांड नौदल अधिकाऱ्याचे कोर्ट मार्शल

By Admin | Updated: January 30, 2015 21:11 IST2015-01-30T21:11:47+5:302015-01-30T21:11:47+5:30

नवी दिल्ली : गेल्या वर्षी आयएनएस सिंधुरत्न पाणबुडीला लागलेल्या आगीच्या संदर्भात बाणबुडीच्या कमांडिंग ऑफिसरचे कोर्ट मार्शल करण्याचा आदेश देण्यात आला आहे. तसेच अन्य सहा अधिकाऱ्यांना निष्काळजीपणा दाखविल्याबद्दल नोटीस बजावण्यात आली आहे. या पाणबुडीला लागलेल्या आगप्रकरणी या सहा अधिकाऱ्यांना दोषी ठरविण्यात आले आहे. या अग्निकांडानंतर तत्कालीन नौदल प्रमुख डी. के. जोशी यांनी राजीनामा दिला होता.

INS Sindhuratna fire brigade court martial court | आयएनएस सिंधुरत्न अग्निकांड नौदल अधिकाऱ्याचे कोर्ट मार्शल

आयएनएस सिंधुरत्न अग्निकांड नौदल अधिकाऱ्याचे कोर्ट मार्शल

ी दिल्ली : गेल्या वर्षी आयएनएस सिंधुरत्न पाणबुडीला लागलेल्या आगीच्या संदर्भात बाणबुडीच्या कमांडिंग ऑफिसरचे कोर्ट मार्शल करण्याचा आदेश देण्यात आला आहे. तसेच अन्य सहा अधिकाऱ्यांना निष्काळजीपणा दाखविल्याबद्दल नोटीस बजावण्यात आली आहे. या पाणबुडीला लागलेल्या आगप्रकरणी या सहा अधिकाऱ्यांना दोषी ठरविण्यात आले आहे. या अग्निकांडानंतर तत्कालीन नौदल प्रमुख डी. के. जोशी यांनी राजीनामा दिला होता.
नौदलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बोर्ड ऑफ इन्क्वायरीची शिफारस नौदल मुख्यालयाने स्वीकृत केली आहे. त्यात आयएनएस सिंधुरत्नचे कमांडिंग ऑफिसर संदीप सिन्हा यांच्याविरुद्ध कोर्ट मार्शल कारवाई करण्याची तर अन्य सहा नौदल अधिकाऱ्यांना निष्काळजीपणा दाखविल्याबद्दल नोटीस जारी करण्यात आली आहे. वेस्टर्न नेवल कमांडतर्फे सिन्हा यांच्याविरुद्धच्या कारवाईची प्रक्रिया सुरू केली जाईल आणि आपला बचाव करण्याची संधी त्यांना मिळेल.
निष्काळजीपणाचे पत्र म्हणजे काय, याचे स्पष्टीकरण देताना या सूत्रांनी सांगितले की, या सहा अधिकाऱ्यांना पुढचे दोन वर्षेपर्यंत कोणत्याही प्रकारची पदोन्नती मिळणार नाही आणि त्यांना अभ्यासक्रमात किंवा विदेशात पदस्थापित केले जाणार नाही. २६ फेब्रुवारी २०१४ रोजी मुंबईच्या समुद्र किनाऱ्याजवळ आयएनएस सिंधुरत्नला आग लागली होती. (वृत्तसंस्था)

Web Title: INS Sindhuratna fire brigade court martial court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.