शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

शत्रूला भरणार धडकी; 'आयएनएस मुरगाव' नौदलाच्या ताफ्यात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2022 06:46 IST

नौदलाची पी १५ बी श्रेणीची दुसरी स्टील्थ गाईडेड मिसाईल विनाशिका नौदलाच्या ताफ्यात रविवारी दाखल झाली.

मुंबई : आयएनएस मुरगाव डी-६७ ही भारतीय नौदलाची पी १५ बी श्रेणीची दुसरी स्टील्थ गाईडेड मिसाईल विनाशिका नौदलाच्या ताफ्यात रविवारी दाखल झाली. डॉकयार्ड येथे झालेल्या दिमाखदार सोहळ्याला संरक्षणमंत्री राजनाथसिंह उपस्थित होते. यावेळी गोव्याचे राज्यपाल श्रीधरन पिल्लई, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, सीडीएस जनरल अनिल चौहान, नौदलाचे व्हाइस ॲडमिरल अजेंद्र बहादूर सिंग, नौदलाच्या पश्चिम विभागाचे कमांडर, तसेच व्हाइस ॲडमिरल नयन प्रसाद (निवृत्त) आदी मान्यवर उपस्थित होते. 

नौदलाच्या युद्ध नौका डिझाइन ब्युरोने ही युद्ध नौका डिझाइन केली आहे. स्वदेशी वस्तूंच्या वापरात लक्षणीय वाढ केल्याने, पी १५ बी  विनाशिका युद्ध नौका निर्मिती हे आत्मनिर्भरतेचे उत्तम उदाहरण आहे. आयएनएस मुरगाव  हे स्टील्थ, युद्ध शक्ती आणि सुलभ हाताळणी याचे  मिश्रण आहे. या नौकेची बांधणी १७ सप्टेंबर, २०१६ ला सुरू झाली आणि १९  डिसेंबर, २०२१ रोजी गोवा मुक्तीला ६० वर्षे पूर्ण  झाल्याच्या दिवशी या नौकेची समुद्र सफर सुरू झाली.

३०० कर्मचाऱ्यांसाठी राहण्याची सुविधा१९६१ मध्ये १८ डिसेंबरला पोर्तुगीजांच्या तावडीतून गोवा मुक्त करण्यासाठी ऑपरेशन विजयची सुरुवात आली होती. त्यामुळे १८ डिसेंबर रोजी विनाशिका नौदलात दाखल होणे याला विशेष महत्त्व आहे. गोव्यातील ऐतिहासिक किनारी शहराच्या नावावरून आयएनएस मुरगावचे नाव ठेवण्यात आले आहे. या नौकेवर ३०० हून अधिक कर्मचारी-अधिकारी राहू शकतात. 

टॅग्स :Rajnath Singhराजनाथ सिंहIndiaभारत