गंगाजमुनावरील कारवाईची चौकशी करा
By Admin | Updated: February 6, 2015 22:35 IST2015-02-06T22:35:30+5:302015-02-06T22:35:30+5:30
गंगाजमुनावरील कारवाईची चौकशी व्हावी

गंगाजमुनावरील कारवाईची चौकशी करा
ग गाजमुनावरील कारवाईची चौकशी व्हावी नागपूर : शहरातील कुप्रसिद्ध गंगाजमुना ही वस्ती हटविण्यासंदर्भात पोलिसांकडून अचानकपणे जी कारवाई करण्यात आली आहे, ती संशयास्पद आहे. यामध्ये बिल्डर आणि भ्रष्ट राजकारण्यांचे हितसंबंध तर जुळलेले नाही ना, अशी शंका येते, तेव्हा शासनाने या कारवाईची सखोल चौकशी करावी, अशी मागणी विविध सामाजिक संघटनांनी यासंदर्भात स्थापन केलेल्या शोध समितीचे सदस्य जम्मू आनंद आणि दीनानाथ वाघमारे यांनी शुक्रवारी एका पत्रपरिषदेत केली. गंगाजमुना ही कुप्रसिद्ध वस्ती आहे. परंतु त्यांना तडकाफडकी येथून हटविल्यास हा प्रश्न सुटणार नाही. हा एक सामाजिक प्रश्न असून तो धोरणात्मकरीत्या सुटू शकतो, पोलिसांच्या थेट कारवाईने सुटणार नाही. त्यामुळे सर्वप्रथम येथील परिस्थिती पूर्ववत करण्यात यावी. तेथील शाळेत जाणाऱ्या मुलांना पुन्हा शाळेत जाण्याची व्यवस्था करावी. वेश्या व्यवसाय करणाऱ्या सर्व विस्थापितांचे सर्वेक्षण करण्यात यावे, सर्वप्रथम त्यांना रेशनकार्ड द्यावे, निवडणूक ओळख पत्र, आधार कार्ड द्यावे, या महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या पुनर्वसन योजनेत येथील महिलांचाही समावेश करून विस्तृत योजना तयार करण्यात यावी, अशी मागणी सुद्धा त्यांनी पत्रपरिषदेत केली.