आतील पान- मोदी-थरुर

By Admin | Updated: June 7, 2014 00:35 IST2014-06-06T23:44:09+5:302014-06-07T00:35:13+5:30

(बातमी अवश्य वापरावी)

Inner Pan-Modi-Tharoor | आतील पान- मोदी-थरुर

आतील पान- मोदी-थरुर

(बातमी अवश्य वापरावी)
मोदीप्रशंसेबद्दल थरूर
यांना आता इशारापत्र
काँग्रेस नाराज : खुलाशातही व्यक्त केला नाही खेद

शीलेश शर्मा/ नवी दिल्ली : केरळचे खासदार शशी थरुर यांना मोदींचे गुणगान महाग पडू शकते. त्यांनी दिलेल्या खुलाशावर असमाधान व्यक्त करीत काँग्रेसने त्यांना इशारा पत्र पाठविण्याची तयारी केली आहे.
काँग्रेसच्या नेत्यांनी भविष्यात तोलूनमापून बोलावे हा त्यामागचा उद्देश आहे. मोदी बदलले असून सर्वसमावेशक भूमिका अंगिकारत त्यांनी सर्वांना सोबत घेऊन चालण्याची भाषा वापरली आहे, या शब्दांत थरुर यांनी मोदींची प्रशंसा केली होती. मोदींच्या नव्या अवताराची थरुर यांनी प्रशंसा केल्यानंतर काँग्रेसमध्ये खळबळ उडाली. मोदींचा वाढता प्रभाव आणि वलयामुळे काँग्रेसमध्ये आधीच अस्वस्थता असताना थरुर यांच्या विधानाने भर घातली आहे. दिग्विजयसिंग, अजय माकन यांच्यासह सर्व ज्येष्ठ नेत्यांनी थरुर यांना धारेवर धरले. त्यानंतर थरुर यांनी पत्र पाठवून खुलासा केला मात्र त्यात कोणताही खेद व्यक्त न करता मोदींच्या चांगल्या पावलांना विरोध केल्यास पक्षाला नुकसान सोसावे लागेल, असा सल्लाही देऊन टाकला. ही सुरुवात असून काँग्रेस विरोधाला विरोध करीत असल्याचा संदेश जाऊ नये असेही थरुर यांनी म्हटले.
---------------
बंडखोरीची चिंता
थरुर यांच्या उत्तरावर काँग्रेसचे नेतृत्व समाधानी नाही. त्यामुळे लवकरच त्यांना इशारापत्र पाठविले जाईल. लोकसभा निवडणुकीनंतर कॉंग्रेस नेतृत्वाला बंडखोरीचा वास येऊ लागला आहे. त्यामुळे प्रत्येक छोट्या बाबींवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. कोणतीही ठिणगी आगीत बदलू नये यासाठी अशा बाबींकडे गांभीर्याने बघितले जात आहे.

Web Title: Inner Pan-Modi-Tharoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.