शहीद जवानांच्या अंत्यसंस्कारांसाठी निघालेल्या जवानांच्या गाडीला अपघात, 6 जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2016 18:34 IST2016-02-15T18:34:32+5:302016-02-15T18:34:32+5:30
सियाचेनमध्ये शहीद झालेल्या जवानांच्या अंत्यसंस्कारांसाठी निघालेले मद्रास रेजिमेंटचे सहा जवान वाहन अपघातात जखमी झाले आहेत.

शहीद जवानांच्या अंत्यसंस्कारांसाठी निघालेल्या जवानांच्या गाडीला अपघात, 6 जखमी
>ऑनलाइन लोकमत
उधगमंडलम (तामिळनाडू), दि. 15 - सियाचेनमध्ये शहीद झालेल्या जवानांच्या अंत्यसंस्कारांसाठी निघालेले मद्रास रेजिमेंटचे सहा जवान वाहन अपघातात जखमी झाले आहेत.
सियाचेनमधल्या हिमस्खलनामध्ये शहीद झालेल्या मद्रास रेजिमेंटच्या 10 जवानांपैकी दोघांवर बंगळूरमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. त्यासाठी मद्रास रेजिमेंटचे सहा जवान तामिळनाडूतून निघाले होते. परंतु वाहनचालकाचाताबा सुटल्यामुळे गाडीचा अपघात झाला आणि सहा जवान जखमी झाल्याचे पोलीसांनी सांगितले. जखमी झालेल्या जवानांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अन्य जवान बंगळूरला रवाना झाले आहेत.
सियाचेनमधल्या दुर्देवी नैसर्गिक आपत्तीत शहीद झालेल्या नागेश व महेश या दोन जवानांवर बंगळूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत.