अमानुष..! 9 वर्षांच्या मुलाची हत्या करून प्यायले रक्त, खाल्ले मांस

By Admin | Updated: January 21, 2017 07:46 IST2017-01-21T07:37:31+5:302017-01-21T07:46:31+5:30

पंजाबमधील लुधियानामध्ये एका अल्पवयीन मुलाने 9 वर्षांच्या मुलाची हत्या करून त्याचे मांस खाल्ल्याची आणि रक्त प्यायल्याची अमानुष घटना समोर आली आहे.

Inhuman ..! The blood of the 9-year-old boy killed, eaten meat | अमानुष..! 9 वर्षांच्या मुलाची हत्या करून प्यायले रक्त, खाल्ले मांस

अमानुष..! 9 वर्षांच्या मुलाची हत्या करून प्यायले रक्त, खाल्ले मांस

>ऑनलाइन लोकमत
लुधियाना, दि. 21 - पंजाबमधील लुधियानामध्ये एका अल्पवयीन मुलाने 9 वर्षांच्या मुलाची हत्या करून त्याचे मांस खाल्ल्याची आणि रक्त प्यायल्याची अमानुष घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी 16 वर्षांच्या मुलाला अटक केली आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपू कुमार असे मृत मुलाचे नाव असून तो आणि आरोपी एकाच परिसरात राहत होते. दीपू सोमवारपासून बेपत्ता होता. याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेज तपासले असता दीपू एका अल्पवयीन मुलासोबत जात असताना त्यांना दिसले. त्यानंतर पोलिसांनी त्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा कबूल केला. 
घरी कोणीही नसल्याची संधी साधत आरोपीने सोमवारी दुपारी 1.40 च्या सुमारास दीपूला पतंगाचे आमिष दाखवत घरी नेले. त्यानंतर त्याने दीपूचा गळा आवळून खून केला आणि त्याच्या शरीराचे तुकडे केले. ते तुकडे पॉलिथिन बॅग्जमध्ये भरले आणि ते फेकून देण्यासाठी तो सायकलवरून बाहेर पडला.आरोपी त्याच्या शिक्षकांचा खूप दु:स्वास करत असे आणि त्यामुळेच शाळेच नाव खराब व्हावे यासाठीच त्याने  दीपूचे हृदय त्याच्या शाळेच्या आवारात फेकून दिले, असे पोलिसांनी सांगितले. आरोपीला माणसाच्या मांसाची चटक लागली होती. तो अनेकवेळेस चिकनही कच्चं खात असे, असी माहितीही पोलिसांनी दिली.

Web Title: Inhuman ..! The blood of the 9-year-old boy killed, eaten meat