सौदीत तीन भारतीयांना अमानुष मारहाण

By Admin | Updated: December 23, 2015 19:29 IST2015-12-23T19:22:10+5:302015-12-23T19:29:34+5:30

सौदीतील एका कर्मचा-यांने तीन भारतीयांना लाकडाच्या दांडूक्याने मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे या तिघांना मारहाण केल्याचा भयावह

Inhuman beat three Indians in Saudi Arabia | सौदीत तीन भारतीयांना अमानुष मारहाण

सौदीत तीन भारतीयांना अमानुष मारहाण

ऑनलाइन लोकमत
तिरुअनंतपुरम, दि.२३ - सौदीतील एका कर्मचा-यांने तीन भारतीयांना लाकडाच्या दांडूक्याने मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे या तिघांना मारहाण केल्याचा भयावह असा व्हिडीओ त्यांच्या कुटुंबियांना पाठवून देण्यात आला आहे. 
मारहाण करण्यात आलेले तिघे केरळ राज्यातील हरीपाड येथील असून या तिघांना सौदीतील येमनमध्ये वायरमनचे काम देण्यासाठी बोलविण्यात आले होते. मात्र या ठिकाणी त्यांना अशा स्वरुपाचे काम न देता सौदीतील अभा येथे वीटा बनविणा-या कंपनीमध्ये काम करण्यास भाग पाडले.  
दरम्यान, याप्रकरणी चौकशी करण्यासाठी सरकारी अधिकारी सौदीतील भारतीय राजदूताच्या संपर्कात असून त्यांना दोन दिवसांत भारतात परत आणले जाईल, असे केरळाचे मुख्यमंत्री ओमन चंडी यांनी सांगितले. तसेच, त्यांच्या कुटुंबियांना पाठविण्यात आलेल्या व्हिडीओच्या माध्यमातून या तिघांनी भारतात परत येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या घटनेमुळे केरळमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

 

Web Title: Inhuman beat three Indians in Saudi Arabia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.