शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Video: रस्त्यावर नाही तर झाडावर चढणारी अनोखी बाईक; काही सेकंदात गाठणार झाडाचं टोक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2019 12:51 IST

ही मशीन खासकरुन सुपारी आणि नारळाच्या झाडावर चढण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. याचं वजन 28 किलो असून यावर 80 किलोचा माणूस सहजरित्या बसून झाडाच्या टोकापर्यंत जाऊ शकतो.

बंगळुरु - नारळाच्या किंवा सुपारीच्या झाडावर चढण्यासाठी नेहमी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अनेकदा नारळाच्या झाडावर चढताना दुर्घटना घडून मृत्यू झाल्याच्याही घटना घडल्या आहेत. या अनेक संकटावर मात करण्यासाठी कर्नाटकातील एका शेतकऱ्याने अनोख प्रयोग शोधून काढला आहे. मंगळुरु येथील गणपती नावाच्या शेतकऱ्याने नारळ किंवा सुपारीच्या झाडावर चढण्यासाठी एक खास बाईक तयार केली आहे. ही बाईक एक लीटर पेट्रॉलमध्ये 80 झाडांवर चढण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. मान्सूनकाळात सुपारी अथवा नारळाच्या झाडांना किडे लागण्याची शक्यता असते. त्यामुळे या झाडांवर किटकनाशक फवारणी करणे गरजेचे असते. किटकनाशके फवारणीसाठी झाडाच्या टोकापर्यंत पोहचणं कठीण होऊन जातं. त्यामुळे दोरीच्या सहाय्याने अथवा बांबूच्या आधाराने शेतकरी झाडावर चढण्याचा प्रयत्न करतात. 

गणपती या शेतकऱ्याने या संकटाला सामोरं जाण्यासाठी आव्हान म्हणून स्वीकारलं आणि नवीन प्रयोग करत एक मशीन तयार केली. या मशीनच्या साहय्याने काही सेकंदात तुम्ही यावर बसून झाडाच्या टोकापर्यंत पोहचू शकता. त्यामुळे झाडाच्या टोकांवर किटकनाशके फवारणी करताना तुम्हाला कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. 

या मशीनबाबत सांगताना गणपतीने सांगितले की, ही मशीन खासकरुन सुपारी आणि नारळाच्या झाडावर चढण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. याचं वजन 28 किलो असून यावर 80 किलोचा माणूस सहजरित्या बसून झाडाच्या टोकापर्यंत जाऊ शकतो. गणपतीने बनविलेल्या या बाईकला लोकांकडून मोठ्य़ा प्रमाणात मागणी सुरु झाली आहे. ही बाईक खरेदी करण्यासाठी गणपतीकडे ग्राहकांची रांग लागली आहे. गणपतीची मुलगी सुप्रियाने सांगितले की, नारळाच्या अथवा सुपारीच्या झाडावर चढण्यासाठी शेतकऱ्यांना कमीत कमी 8 मिनिटे लागतात मात्र या मशीनमुळे अवघ्या 30 सेकंदात तुम्ही झाडाच्या टोकापर्यंत पोहचू शकतात त्यामुळे वेळ वाचविण्यासाठीही या मशीनचा वापर होणार आहे. 

गणपतीने बनविलेल्या या बाईकमुळे इतर शेतकरीही आनंदी आहेत. सुपारी उत्पादक शेतकऱ्यांना ही बाईक उपयोगाची ठरणार असून ही बाईक सहज उपलब्ध होऊ शकते आणि त्याची किंमतही कमी आहे. बाजारात मिळणाऱ्या मशीनपेक्षा गणपतीने बनविलेली बाईक वजनाने हलकी आणि स्वस्तही आहे असं शेतकरी राजारामने सांगितले.    

टॅग्स :bikeबाईकPetrolपेट्रोलFarmerशेतकरी