पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन
By Admin | Updated: August 14, 2016 07:33 IST2016-08-14T07:33:45+5:302016-08-14T07:33:45+5:30
पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. पाकिस्तानच्या सैन्याने भारत-पाकिस्तान सीमेवरील पूंछ सेक्टरमध्ये भारतीय सैन्याच्या

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन
>ऑनलाइन लोकमत
जम्मू , दि. १४ - पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे.
पाकिस्तानच्या सैन्याने भारत-पाकिस्तान सीमेवरील पूंछ सेक्टरमध्ये भारतीय सैन्याच्या चौक्यांवर गोळीबार केला. रविवारी पहाटेच्या सुमारास हा गोळीबार करण्यात आला. पाकिस्तानकडून करण्यात येणाऱ्या गोळीबाराला भारतीय जवानांनीही प्रत्युत्तर दिल्याचे सांगण्यात येत आहे.
पाकिस्तानकडून भारतीय सैन्याच्या चौक्यांसह सीमा भागातील नागरिकांना लक्ष करण्यात आले. मात्र या भागात कोणतीही जिवित अथवा वित्तहानी झाली नसल्याचे अद्याप समजते.