निती आयोगाच्या बैठकीसाठी जिल्ातून मागविली माहिती
By Admin | Updated: February 8, 2015 00:19 IST2015-02-08T00:19:24+5:302015-02-08T00:19:24+5:30
नागपूर: ८ फेब्रुवारीला दिल्ली येथे होणाऱ्या निती आयोगाच्या पहिल्या बैठकीसाठी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांबाबतची माहिती तातडीने मागविण्यात आली आहे.

निती आयोगाच्या बैठकीसाठी जिल्ातून मागविली माहिती
न गपूर: ८ फेब्रुवारीला दिल्ली येथे होणाऱ्या निती आयोगाच्या पहिल्या बैठकीसाठी राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांबाबतची माहिती तातडीने मागविण्यात आली आहे. नियोजन आयोग बरखास्त करून मोदी सरकारने निती आयोग स्थापन केला आहे. या आयोगाची पहिली बैठक ८ तारखेला होणार आहे. या बैठकीसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कायद्यानुसार विविध प्रकल्पांसाठी करण्यात आलेले भूसंपादन, त्यासाठी देण्यात आलेला मोबदला, प्रलंबित निवाडे,संयुक्त मोजणी आणि प्रकल्पाची सद्यस्थिती याबाबतची प्रकल्पनिहाय माहिती जिल्हाधिकाऱ्यांकडून मागविण्यात आली आहे. तसे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले आहे. (प्रतिनिधी)