शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

बिहारमधील बसच्या 'त्या' आगीतून संशयाचा धूर, २७ जणांच्या मृत्यूचंही गूढ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2018 14:45 IST

अपघाताबद्दल समोर आलेली नवी माहिती धक्कादायक

पटना: बिहारमध्ये झालेल्या अपघात प्रकरणात आता नवी माहिती समोर आलीय. या अपघातात एकाही व्यक्तीचा मृत्यू झाला नसल्याचं बिहारच्या आपत्ती व्यवस्थापन मंत्र्यानं सांगितलंय. या बसमधून 13 जण प्रवासी करत होते. मात्र अपघातानंतर कोणत्याही व्यक्तीचा मृतदेह मिळाली नसल्याची माहिती मंत्री दिनेश चंद्र यादव दिली. विशेष म्हणजे या अपघातात 27 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती खुद्द दिनेश चंद्र यादव यांनी काल दिली होती. या दुर्घटनेनंतर बिहारचे मुख्यमंत्री नीतिश कुमार यांनी मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदतदेखील जाहीर केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी या घटनेनंतर ट्विट करुन शोक व्यक्त केला होता. या अपघाताची माहिती जाहीर करण्याची घाई केल्याबद्दल बिहार सरकारवर टीका होतेय. ही घटना गुरुवारी रात्री घडली. बिहारच्या मोतिहारी जिल्ह्याच्या कोटवामध्ये मुजफ्फरपूरहून दिल्लीला जाणारी बस पुलावरुन कोसळली. यानंतर बसला आग लागली. या बसमध्ये 30 प्रवासी होते. त्यातील 27 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सुरुवातीला समोर आली होती. बिहार सरकारचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री दिनेश चंद्र यादव यांनीदेखील 27 प्रवाशांचा मृत्यू झाल्याच्या माहितीला दुजोरा दिला होता. शुक्रवारी बचाव कार्य पूर्ण झाल्यानंतर वेगळीच माहिती समोर आली. अपघातग्रस्त बसमध्ये एकही मृतदेह न मिळाल्याची माहिती मुजफ्फरपूर झोनचे पोलीस महानिरीक्षक अनिल कुमार यांनी दिली. या अपघातातून 8 लोकांना वाचवण्यात आल्याचंही कुमार यांनी सांगितली. यानंतर स्पष्टीकरण देण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन मंत्री दिनेश चंद्र यादव माध्यमांसमोर आले.  

टॅग्स :AccidentअपघातBiharबिहार