पोलिस वसाहतीचा अहवाल सादर करण्याच्या सूचना अहमदपूरची वसाहत : इमारतींची दुरावस्था, केवळ ५२ निवासस्थाने अहमदपूर : शहरातील पोलिस वसाहतीची दुरावस्था झाली आहे़ या
By Admin | Updated: July 2, 2015 23:47 IST2015-07-02T23:47:29+5:302015-07-02T23:47:29+5:30
अहमदपूर शहर हे संवेदनशील म्हणून ओळखले जाते़ शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून पोलिसांना नेहमी दक्ष रहावे लागते. येथील पोलिस कर्मचार्यांना राहण्यासाठी वसाहत असून तिथे ५२ निवासस्थाने आहेत़ ही निवासस्थाने तीन तपापूर्वी बांधण्यात आली आहेत़ या इमारतींवर सिमेंटच्या पत्र्यांचे छत आहे़ त्यातील सहा इमारती ा निजामकाळात बांधण्यात आल्या आहेत़ सध्याची ही घरे पोलिस कर्मचार्यांना राहण्यासाठी योग्य अशी नसल्याची तक्रार वारंवार पोलिस कर्मचारी करीत आहेत़ वसाहतीतील प्रत्येक कर्मचार्याने निवासासाठी एका पत्र्याच्या शेडची निर्मिती केली.

पोलिस वसाहतीचा अहवाल सादर करण्याच्या सूचना अहमदपूरची वसाहत : इमारतींची दुरावस्था, केवळ ५२ निवासस्थाने अहमदपूर : शहरातील पोलिस वसाहतीची दुरावस्था झाली आहे़ या
अ मदपूर शहर हे संवेदनशील म्हणून ओळखले जाते़ शहरातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून पोलिसांना नेहमी दक्ष रहावे लागते. येथील पोलिस कर्मचार्यांना राहण्यासाठी वसाहत असून तिथे ५२ निवासस्थाने आहेत़ ही निवासस्थाने तीन तपापूर्वी बांधण्यात आली आहेत़ या इमारतींवर सिमेंटच्या पत्र्यांचे छत आहे़ त्यातील सहा इमारती ा निजामकाळात बांधण्यात आल्या आहेत़ सध्याची ही घरे पोलिस कर्मचार्यांना राहण्यासाठी योग्य अशी नसल्याची तक्रार वारंवार पोलिस कर्मचारी करीत आहेत़ वसाहतीतील प्रत्येक कर्मचार्याने निवासासाठी एका पत्र्याच्या शेडची निर्मिती केली. पोलिस वसाहतीमध्ये ५० टक्केच पोलिसांना राहण्यासाठी जागा उपलब्ध असून, उर्वरित पोलिस कर्मचार्यांना भाड्याच्या घरात रहावे लागत आहे़ पोलिस कर्मचार्यांच्या निवासस्थानाची समस्या नगरसेवक डॉ. सिद्धार्थकुमार सूर्यवंशी यांनी गेल्या तीन वर्षांपासून मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पोलिस महासंचालक यांच्याकडे मांडली आहे़ तसेच आमदार विनायकराव पाटील यांनीही पाठपुरावा केला आहे़ त्यामुळे पोलिस महासंचालकांचे कार्यासन अधिकारी एस.आर. सावंत यांनी पोलिस अधीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण यांच्याकडे अहमदपूरच्या पोलिस वसाहतीचा अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या़ त्यामुळे पोलिस अधीक्षक चव्हाण यांनी पोनि. मनीष कल्याणकर यांना पत्र पाठवून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्याकडून पाहणी करून तात्काळ अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत़......... चौकट............सध्याची पोलिस वसाहत नगर परिषदेच्या आराखड्यामध्ये पोलिस वसाहतीच्या बाजूलाच आरक्षित करण्यात आली होती. पण नगरसेवकांनी विशेष सभा बोलावून वसाहतीचे हे आरक्षण उठवून बौद्धनगर घरकुल योजनेसाठी दिले. त्यामुळे सध्या पोलिस वसाहतीसाठी जागा नाही, परंतु शहरालगत हगदळ-गुगदळ आणि एमआयडीसी परिसरालगतच मोठ्या प्रमाणात गायरान जमीन शिल्लक असल्याने तिथे जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नगरसेवक डॉ. सिद्धार्थकुमार सूर्यवंशी यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे़