समुद्रात जप्त नौकेबाबत पाकला पाहिजे माहिती
By Admin | Updated: April 23, 2015 01:32 IST2015-04-23T01:32:53+5:302015-04-23T01:32:53+5:30
गुजरातच्या पोरबंदर येथून दूर समुद्रात आठ संशयित पाकिस्तानी तस्करांच्या अटकेचा मुद्दा पाकिस्तानने बुधवारी भारतासमक्ष उपस्थित करीत, याबाबत औपचारिक माहिती मागितली

समुद्रात जप्त नौकेबाबत पाकला पाहिजे माहिती
नवी दिल्ली : गुजरातच्या पोरबंदर येथून दूर समुद्रात आठ संशयित पाकिस्तानी तस्करांच्या अटकेचा मुद्दा पाकिस्तानने बुधवारी भारतासमक्ष उपस्थित करीत, याबाबत औपचारिक माहिती मागितली.
पाकिस्तानी प्रसिद्धी प्रवक्ता मंजूर अली मेमन यांनी ही माहिती दिली. दोन पाकिस्तानी नौका जप्त करून त्याच्या चालक दलाच्या सदस्यांना अटक करण्यात आल्याचे वृत्त भारतीय मीडियाने दिले आहे. पाकिस्तानी उच्चायोगाने यासंदर्भात औपचारिकरीत्या भारतीय परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधला आहे.
गत २० एप्रिलला एका गुप्त सूचनेच्या आधारावर नौदल आणि तटरक्षक दलाने संयुक्तरीत्या गुजरात किनाऱ्यापासून दूर आंतरराष्ट्रीय सागरी सीमेत २३२ किलो मादक पदार्थ घेऊन जाणारी एक नौका जप्त केली होती. शिवाय या नौकेच्या चालक दलाच्या आठ पाकी नागरिकांना अटक केली होती. या मादक पदार्थांची किंमत ६०० कोटींच्या घरात आहे.