शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

बेवारस मृतदेहाच्या ओळखीसाठी ‘आधार’ची माहिती निरुपयोगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2018 06:46 IST

‘युआयडीएआय’ची हायकोर्टात कबुली

मुंबई : एखाद्या बेवारस मृतदेहाच्या हाताच्या बोटांचे ठसे ताडून पाहून त्या मयताची ओळख पटविण्यासाठी ‘आधार’ कार्डांसाठी गोळा केलेल्या माहितीची काहीच मदत होऊ शकत नाही, असे ‘आधार’चे काम पाहणाऱ्या ‘युनिक आयडेन्टिफिकेशन अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडिया’ने (युआयडीएआय) मुंबई उच्च न्यायालयास कळविले आहे.औरंगाबाद जिल्ह्यातील दौलताबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या वर्षी एका अनोळखी महिलेचा मृतहेद मिळाला. पोलिसांनी खून व पुरावे नष्ट करण्याचा गुन्हा नोंदवून तपास सुरू झाला. परंतु मृतदेहाची ओळख पटविण्याचे शक्य ते सर्व प्रयत्न करूनही ओळख पटली नाही. अखेर पोलिसांनी ‘आधार’ कायद्याच्या कलम ३३(१) अन्वये मृतदेहाच्या हाताच्या बोटांचे ठसे ‘आधार’ कार्डांसाठी घेतलेल्या ठश्यांशी ताडून पाहून ओळख पटविण्यासाठी जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज केला. परंतु त्या न्यायालयाने तसा आदेश दिला नाही म्हणून सरकारने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात रिट याचिका केली. न्या. विश्वास काशिनाथ जाधव यांच्यापुढे सुनावणी झाली तेव्हा अ‍ॅथॉरिटीचे मुंबईतील उपसंचालक भालचंद्र विष्णू जिचकर स्वत: न्यायालयात हजर होते. त्यांच्याकडून माहिती घेऊन केंद्र सरकारचे ज्येष्ठ स्थायी वकील बी. बी. कुलकर्णी यांनी असे सांगितले की, देशभरात १२२ कोटींहून अधिक व्यक्तींना ‘आधार’ कार्ड देण्यात आली आहेत. परंतु अ‍ॅथॉरिटीकडे जी तंत्रशास्त्रीय संरचना उपलब्ध आहे त्यात संबंधित व्यक्तीचा ‘आधार’ क्रमांक न देता हाताचे ठसे ताडून पाहण्याची सोय नाही. त्यामुळे या प्रकरणी तपासी अधिकाऱ्यास मदत करण्याची अ‍ॅथॉरिटीची इच्छा असली तरी ती करणे शक्य नाही.सरकारची याचिका फेटाळलीअ‍ॅथॉरिटीने असेही सांगितले की, आम्ही ‘आधार’साठी बोटांचे ठसे व डोळ््याच्या बुब्बुळाचे स्कॅन यासारखी बायोमेट्रिक माहिती घेण्यासाठी जे तंत्रज्ञान वापरतो ते न्यायवैद्यकाच्या दृष्टीने उपयुक्त नाही. त्यामुळे अनोळखी व्यक्तीचे ठसे आमच्याकडे असलेल्या ठशांशी जुळतात का हे ताडून पाहणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नाही. त्यावर न्या. जाधव यांनी म्हटले की, या पार्श्वभूमीवर अनुकूल आदेश न देता सत्र न्यायालयाने पोलिसांचा अर्ज निकाली काढणे चुकीचे होते, असे वाटत नाही. याआधारे सरकारची याचिका फेटाळण्यात आली.

टॅग्स :Adhar Cardआधार कार्डMumbai High Courtमुंबई हायकोर्ट