शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

Inflation: महागाईचा भडका उडणार, पुढील महिन्यात भाकरी, ब्रेड, बिस्कीट महागणार, समोर आलं असं कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2022 21:08 IST

Inflation: गेल्या काही दिवसांमध्ये सर्वच क्षेत्रातील महागाई प्रचंड वाढली आहे. दरम्यान, जूनमध्ये महागाईचा प्रचंड भडका उडण्याची शक्यता असून, भाकरी, ब्रेड, बिस्कीट अशा जीवनावश्यक वस्तूंचे भाव वधारण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली -  गेल्या काही दिवसांमध्ये सर्वच क्षेत्रातील महागाई प्रचंड वाढली आहे. दरम्यान, जूनमध्ये महागाईचा प्रचंड भडका उडण्याची शक्यता असून, भाकरी, ब्रेड, बिस्कीट अशा जीवनावश्यक वस्तूंचे भाव वधारण्याची शक्यता आहे.  फूड कॉर्पोरेशन अॉफ इंडिया दर वर्षी ओपन मार्केट सेल स्किमच्या माध्यमातून गव्हाची विक्री करते. मात्र सरकारने आतापर्यंत याबाबत काही सूचना दिलेली नाही. त्यामुळे यावर्षी सरकार ओएमएसआयच्या माध्यमातून विक्री केली नाही, तर किमती गगनाला अशी भीती व्यापाऱ्यांना वाटत आहे.

जून-जुलै महिन्यात मान्सूनचे आगमन आणि शाळा-कॉलेज पुन्हा सुरू झाल्याने गव्हाची मागणी वाढते. सरकार ही मागणी पूर्ण व्हावी यासाठी ओएमएसआयच्या माध्यमातून गहू विविध कंपन्या आणि व्यापाऱ्यांना विकते.

दरम्यान, गेल्या तीन वर्षांपासून भारतामध्ये गव्हाचं सरप्लस उत्पादन होत आहे. अशा परिस्थितीत जून-जुलैमध्ये एफसीआय आपल्या स्टॉकमध्ये ठेवलेला गहू सवलतीच्या दरात आणि माल वाहतुकीवर सवलत देऊन विक्री करते. आता यावर्षी सरकारने ओएमएसएसच्या माध्यमातून गहू विक्री न केल्यास कंपन्यांना तो खुल्या बाजारातून खरेदी करावा लागेल. 

एका मिल मालकाने सांगितले आहे की, सरकारने आम्हाला एफसीआयवर अवलंबून राहू नका, असा सल्ला दिला आहे. यावर्षी पासून ते खासगी व्यापाऱ्यांना गव्हाची विक्री करणार आहेत की नाही हे निश्चित नाही. तर पीठ उद्योगाने अन्न मंत्रालयाला पत्र लिहून या संकटाचा इशारा दिला आहे. पत्रामध्ये त्यांनी सरकारकडे असलेल्या गव्हाच्या टंचाईचा मुद्दा उपस्थित केला आहे. राज्य सरकारांना कल्याणकारी योजनांसाठी देण्यात येणाऱ्या गव्हाचा पुरवठाही थांबवण्यात आला आहे.

पत्रामधून स्पष्ट करण्यात आले की, इंडस्ट्री संभवतः बाजारामध्ये योग्य किमतींमध्ये पीठ उपलब्ध करू शकणार नाही. त्याचा थेट परिणाम हा अन्न आणि ब्रेड-बिस्कीट उद्योगावर होणार आहे.  तज्ज्ञांच्या मते ओएमएसएस बाजारामध्ये गव्हाच्या किमती नियंत्रित करण्यासाठीचा सरकारकडील एकमेव मार्ग आहे. त्याचा वापर करून सरकार बाजारात हस्तक्षेप करण्यापासून वाचू शकते.

टॅग्स :InflationमहागाईIndiaभारतbusinessव्यवसाय