शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

देशात महागाई वाढली, तरी सरकार आकडेमोडीत व्यग्र; काँग्रेसचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2024 09:09 IST

गेल्या १० वर्षांत केंद्र सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे महागाई सातत्याने वाढली असून, त्याचा सर्वसामान्यांच्या आर्थिक स्थितीवर खोलवर परिणाम झाला आहे, असा आरोप त्यांनी केला.

नवी दिल्ली - केंद्र सरकार जनतेच्या हिताचे काम करण्याऐवजी केवळ प्रसिद्धीत आणि आकडेमोड करण्यात गुंतले असल्याचा आरोप गुरुवारी काँग्रेसने केला. सरकारचे संपूर्ण लक्ष महागाई कमी करण्यावर नसून आकडे कमी दाखविण्यावर असल्याची टीका पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केली आहे.ग्राहक किंमत निर्देशांक आणि घाऊक किंमत निर्देशांकाची आकडेवारी अशा प्रकारे मांडण्याचा प्रयत्न केला जात आहे की, महागाई नियंत्रणात येईल, तर सर्वसामान्यांच्या खिशावरचा बोजा सातत्याने वाढत असल्याचे वास्तव आहे. 

गेल्या १० वर्षांत केंद्र सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे महागाई सातत्याने वाढली असून, त्याचा सर्वसामान्यांच्या आर्थिक स्थितीवर खोलवर परिणाम झाला आहे, असा आरोप त्यांनी केला. खाद्यपदार्थ, इंधन आणि दैनंदिन वापराच्या वस्तूंच्या किमतीत झपाट्याने वाढ झाली आहे. विशेषतः डाळी, तेल, भाजीपाला आणि दूध यासारख्या अत्यावश्यक अन्नपदार्थांच्या किमतींचा भडका उडाला आहे. त्याचा सामान्य नागरिकांच्या बजेटवर परिणाम होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी होऊनही पेट्रोल आणि डिझेल महागले. त्यामुळे वाहतूक आणि इतर सेवांचा खर्च वाढला. आज महागाई वाढण्याचे प्रमुख कारण म्हणजे खाद्यपदार्थांच्या वाढत्या किमती आहेत. अशामध्ये सरकार महागाई कमी करण्यापेक्षा आकडे कमी करण्यालाच प्राधान्य असल्याचा दावा रमेश यांनी केला.

आकडेमोड करून देशाची दिशाभूलमहागाई कमी दाखविण्याचा हा सरकारचा पहिलाच प्रयत्न नाही. केंद्र सरकारने वारंवार आकडेमोड करून देशाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे. जेव्हा भाजप सरकार जीडीपी विकास दरात यूपीए सरकारपेक्षा मागे पडू लागले तेव्हा आधार वर्ष बदलून विकास दर कृत्रिमरीत्या वाढविण्याचा प्रयत्न केला गेला. असे करून देशाची खरी आर्थिक स्थिती लपवली गेली, असा आरोप जयराम रमेश यांनी केला.

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाInflationमहागाईCentral Governmentकेंद्र सरकार