शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

महागाई दर घटला, रेपो दराचे काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2018 02:54 IST

रिझर्व्ह बँकेचे पतधोरण आॅक्टोबरमध्ये; इंधन दरवाढीमुळे काळजी कायम

मुंबई : आॅगस्ट महिन्यातील महागाईचा दर ३.७० टक्क्यांपर्यंत घसरल्याने आता रिझर्व्ह बँकेने रेपो दरही कमी करावे, अशी अपेक्षा आर्थिक क्षेत्रातून व्यक्त होत आहे. पण इंधन दरवाढ कायम आहे. त्यामुळे रेपो दर कमी होण्याची शक्यता सध्या तरी कमी आहे, असे बँकेतील सूत्रांचे म्हणणे आहे.रेपो दरात वाढ केली की कर्जे महाग होतात. कर्जे महाग झाली की, बाजारातील क्रयशक्ती कमी होते व त्यातूनच महागाईवर नियंत्रण येते. यासाठीच रिझर्व्ह बँकेने जून व आॅगस्ट या दोन्ही महिन्यातील द्वैमासिक पतधोरण आढाव्यात रेपो दरात पाव-पाव टक्का वाढ केली होती. परिणामी आॅगस्ट महिन्यात महागाईचा दर कमी झाला.रिझर्व्ह बँक आता पुढील द्वैमासिक पतधोरण आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात घोषित करणार आहे. त्याआधीच महागाईत घट झाल्याने वाढलेले रेपो दर कमी करण्याबाबत रिझर्व्ह बँकेने विचार करावा, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. पण इंधनदर सातत्याने वधारत आहेत. तसेच केंद्र सरकारने खरिपाच्या पीकांना दीडपट हमीभावाची घोषणा केली आहे. खरिपाची पीके या महिन्यापासून बाजारात येतील. दीडपट हमीभावामुळे त्यांचे दर तुलनेने अधिक असतील. हे पाहता महागाई आटोक्यात असेलच याची शाश्वती नाही. त्यामुळेच रेपो दर कमी होण्याची शक्यता नाही, असे स्टेट बँकेच्या आर्थिक संशोधन विभागाचेही म्हणणे आहे.लक्ष्य ३.५० टक्क्यांचेरिझर्व्ह बँकेने नोव्हेंबरपर्यंत महागाई दर ३.५० टक्के किंवा त्याखाली आणण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. ते ध्यानात घेऊनच सलग दोनवेळा केलेल्या रेपो दरवाढीचे फलित आॅगस्ट महिन्यातील महागाई दराच्या रुपात दिसले. त्यामुळेच आता आॅक्टोबरच्या पतधोरणात आढाव्यात बँक पुन्हा रेपो दर वाढवेल. जेणेकरुन नोव्हेंबर किंवा डिसेंबरपर्यंत महागाई आणखी नियंत्रणात येईल. महागाई नियंत्रणात आली की जानेवारी २०१९ पासून रेपो दर कमी होऊ शकतील, असे बँकेतील सूत्रांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकFuel Hikeइंधन दरवाढ