बेवफाईवर भडकली प्रेयसी, कापले प्रियकराचे गुप्तांग
By Admin | Updated: January 25, 2017 12:30 IST2017-01-25T12:26:22+5:302017-01-25T12:30:41+5:30
प्रियकराच्या बेवफाईमुळे संतापलेल्या प्रेयसीने चाकूने त्याचे चक्क गुप्तांगच कापल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

बेवफाईवर भडकली प्रेयसी, कापले प्रियकराचे गुप्तांग
ऑनलाइन लोकमत
भोपाळ, दि. 25 - प्रियकराच्या बेवफाईमुळे संतापलेल्या प्रेयसीने चाकूने त्याचे चक्क गुप्तांगच कापल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशातील सीधी जिल्ह्यात ही खळबळजनक घटना घडली आहे. या तरुणाची प्रकृती सध्या गंभीर असून त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान, हल्ला करणा-या प्रेयसीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या दोघांचे प्रेमसंबंध होते, मात्र यादरम्यान तरुणाने भलत्याच तरुणीसोबत लग्न करण्याचा घाट घातला, याला आरोपी तरुणीचा विरोध दर्शवला. यामुळे भडकलेल्या तरुणीने प्रियकराला धडा शिकवण्यासाठी कट रचला. प्लॅननुसार, सोमवारी रात्री तिने प्रियकराला घरी बोलावले आणि मस्करी-मस्करीमध्ये त्याचे डोळे ओढणीने बांधले, आणि यानंतर धारदार चाकूने त्याच्या गुप्तांगावर वार केला. या हल्ल्यात तरुण रक्तबंबाळ झाल्याने त्याची प्रकृती गंभीर आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी तरुणाला सीधीच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथे प्रकृतीत कुठलीही सुधारणा न झाल्याने त्याला रीवाच्या संजय गांधी चिकित्सा महाविद्यालय हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले.
सीधीचे पोलीस अधीक्षक आबिद खान यांनी सांगितले की, तरुणाच्या प्रेयसीला ताब्यात घेण्यात आले आहे. प्रियकराने लग्नासाठी नकार दिला, यामुळे त्याला धडा शिकवण्यासाठी त्याचे गुप्तांग कापल्याची कबुली तिने चौकशीदरम्यान पोलिसांना दिली.