उद्योगपतीच्या मुलाने झाडली स्वत:वर गोळी
By Admin | Updated: February 20, 2015 01:10 IST2015-02-20T01:10:03+5:302015-02-20T01:10:03+5:30
उद्योगपतीच्या मुलाने झाडली स्वत:वर गोळी

उद्योगपतीच्या मुलाने झाडली स्वत:वर गोळी
उ ्योगपतीच्या मुलाने झाडली स्वत:वर गोळीप्रकृती स्थिर : व्यसनमुक्ती केंद्रातील घटनानागपूर : एमआयडीसीच्या मैत्री व्यसनमुक्ती केंद्रातील एका उद्योगपतीच्या मुलाने आपल्या कानपटावर रिव्हॉल्व्हर ठेवून गोळी झाडल्याची घटना गुरुवारी रात्री ७.४५ वाजताच्या सुमारास घडली. यामुळे व्यसनमुक्ती केंद्रात एकच खळबळ उडाली.सौरभ सुरेश शर्मा रा. फ्रेंड्स कॉलनी असे जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. सौरभच्या वडिलांचा अमरावती मार्गावर उद्योग आहे. सौरभला दारूचे व्यसन होते. त्यामुळे तो अनेक दिवसांपासून अमरनगरच्या मैत्री व्यसनमुक्ती केंद्रात उपचार घेत होता. सुरुवातीला सौरभला तेथे भरती करण्यात आले होते. काही काळानंतर तो उपचारासाठी ये-जा करीत होता. नेहमीप्रमाणे गुरुवारी सायंकाळी ७.४५ वाजता सौरभ मैत्री व्यसनमुक्ती केंद्रात आला. तेथे तो असामान्य वर्तणूक करीत होता. त्यावेळी मैत्री व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक पाध्ये तेथे उपस्थित होते. सौरभचे हावभाव पाहून त्यांना शंका आली. सौरभची समजूत घालण्यासाठी ते त्याच्याजवळ आले. त्याचवेळी सौरभने रिव्हॉल्व्हर काढून आपल्या कानपटावर ठेवली. अचानक हा प्रसंग पाहून पाध्ये घाबरले. त्यांनी त्यास रिव्हॉल्व्हर काढून आपल्याशी बोलण्यास सांगितले. याच दरम्यान सौरभने स्वत:वर गोळी झाडली. डोक्यात गोळी लागल्यानंतर तो खाली कोसळला. पाध्ये यांनी त्वरित एमआयडीसी पोलिसांना सूचना देऊन सौरभला वानाडोंगरीच्या लता मंगेशकर रुग्णालयात दाखल केले. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक पाटणकर घटनास्थळी पोहोचले. रात्री उशिरापर्यंत सौरभची प्रकृती सामान्य होती. सौरभ हा मजबूत बांध्याचा असून नशेमुळे तो नेहमी तणावग्रस्त राहात होता. घटनेची माहिती मिळताच सौरभचे कुटुंबीय रुग्णालयात पोहोचले. एमआयडीसी पोलीस रात्री उशिरापर्यंत तपास करीत होते. (प्रतिनिधी)