शहरं
Join us  
Trending Stories
1
चांदी २०% प्रीमियमवरही मिळेना; ऑनलाइन भाव अडीच लाखांवर
2
बिहारमध्ये राबवणार महाराष्ट्र पॅटर्न? अमित शाहांनी टाकला डाव; मुख्यमंत्रिपदावर थेट भाष्य
3
संपादकीय: रक्तपात, संसार अन् भविष्य
4
‘ऑपरेशन ब्लू स्टार’ ही चूकच होती; पण कोणाची? इंदिरा गांधींची खरेच होती का...
5
आजचे राशीभविष्य, १७ ऑक्टोबर २०२५: कामात यश मिळेल, आर्थिक लाभ होईल अन् आत्मविश्वासही वाढेल!
6
राज ठाकरे ना भाजपला हवे आहेत, ना काँग्रेसला!
7
‘घोटाळ्याच्या १५ वर्षांनी घेतला अनिल पवारांनी पदभार; ईडीकडे पुरावा नाही’
8
सॅटेलाईट आधारित टोल यंत्रणा लांबणीवर, ऑपरेशन सिंदूरमुळे घेतला निर्णय...
9
गुजरातमध्ये भाजपचे धक्कातंत्र; सर्वच्या सर्व १६ मंत्र्यांचे राजीनामे
10
मोठे यश! शास्त्रज्ञांनी बनवली 'युनिव्हर्सल किडनी'; रुग्णाचा कोणताही रक्तगट असुदे, प्रत्यारोपण करता येणार
11
मतपत्रिकांचा पर्याय आहे पण; आयोगाकडे मतपेट्याच नाहीत, युती सरकारनेच केली होती तरतूद
12
देशभर ऑनलाइन जुगारावर बंदी घालण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात आज जनहित याचिकेवर सुनावणी 
13
ट्रम्प म्हणाले, ब्रेकिंग न्यूज देऊ का? रशियाचे तेल घेणे भारत थांबवणार   
14
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी आम्हाला पुरेसे मनुष्यबळ द्या!
15
रेल्वे प्लॅटफॉर्मवर व्हिडीओ कॉलवरून केली प्रसूती; थ्री इडियट्ससारखा चमत्कार
16
मालकाच्या मृत्यूनंतर नऊ दिवस लोटले, कुत्रा स्मशानभूमीतच थांबून...
17
देशात शिक्षण, परदेशात सेवा! टॉप-१०० आयआयटीयनपैकी ६२ जणांचा परदेशी ओढा
18
अमेरिकेत रिपोर्टिंगवर निर्बंध; पत्रकारांनी सोडले पेंटागॉन, ॲक्सेस बॅज केले परत 
19
रेकी झाली... टार्गेट ठरले... पण लूट दुसऱ्याच दुकानात, तीन मित्रांच्या पहिल्याच चोरीचा शेवट पोलिस कोठडीत

भारतीयांसाठी उद्या मोठा दिवस; शक्तीशाली योद्धे देशसेवेसाठी झेपावणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2020 16:20 IST

राफेल विमाने 27 जुलैरोजी भारतात आली होती. यानंतर इथे त्यांची चाचणी घेण्यात आली. आता ही पाच लढाऊ विमाने हवाई दलाच्या 17 वी स्क्वाड्रन  'गोल्डन अॅरोज' चा भाग बनणार आहेत.

एलएसीवरील चीनच्या कुरापतींमुळे तणावाचे वातावरण वाढलेले असताना आता एक मोठी बातमी येत आहे. फ्रान्सहून जुलैच्या शेवटच्या आठवड्यात भारतात आलेली खतरनाक राफेल लढाऊ विमाने देशसेवेसाठी झेपावणार आहेत. हवाई दलाला उद्या मोठी ताकद मिळणार असून अंबाला हवाई तळावर अधिकृतरित्या ही पाच विमाने कार्यरत होणार आहेत. 

भारतासाठी आणि हवाई दलासाठी हा क्षण खूप महत्वाचा असणार आहे. यासाठी मोठमोठे अधिकारी आणि मंत्री अंबाला विमानतळावर पोहोचणार आहेत. यामध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, फ्रान्सचे सशस्त्र सैन्याचे मंत्री फ्लोरेंन्स पार्ले देखील सहभागी होणार आहेत. दोन्ही नेते प्रमुख पाहुणे असणार आहेत. 

Reliance Jio दणका करणार; स्वस्त किंमतीचे 1 कोटी स्मार्टफोन विकणार

याशिवाय सीडीएस बिपीन रावत, हवाई दल प्रमुख आरकेएस भदोरिया, सुरक्षा सचिव डॉ अजय कुमार, संरक्षण विभागाचे सचिव डॉ जी सतीश रेड्डी आणि डीआरडीओचे अध्यक्षदेखील येणार आहेत. तसेच संरक्षण मंत्रालयाचे अन्य अधिकारीही उपस्थित राहणार आहेत. 

राफेल विमाने 27 जुलैरोजी भारतात आली होती. यानंतर इथे त्यांची चाचणी घेण्यात आली. आता ही पाच लढाऊ विमाने हवाई दलाच्या 17 वी स्क्वाड्रन  'गोल्डन अॅरोज' चा भाग बनणार आहेत. या प्रसंगी फ्रान्सच्या संरक्षण क्षेत्राचे एक मोठे प्रतिनिधी मंडळही भारतात येत आहे. यामध्ये राफेलची कंपनी दसॉल्ट एव्हीएशनचे अध्यक्ष एरिक ट्रैपियर, मुख्य कार्यकारी अधिकारी एरिक बरनेंगर हे देखील आहेत. 

कंगनाला विनाकारण बोलायची संधी दिली, प्रसिद्धी दिली; शरद पवारांनी शिवसेनेचे कान टोचले

राफेल विमानांची पारंपरिक पद्धतीने सर्व धर्म पूजा केली जाणार आहे. यानंतर राफेल लढाऊ विमान, तेजस आणि सारंग एअरोबेटिक टीम आकाशात झेपावणार आहेत. तसेच हवाई कसरती करणार आहेत. यानंतर राफेल विमानांना पाण्याचा फवारा मारून सलामी दिली जाणार आहे. यानंतर दोन्ही देशांच्या प्रतिनिधींमध्ये चर्चा देखील होणार आहे. 

खळबळजनक! पत्नीलाही पाठवायचा ग्राहकांकडे; ऑनलाईन सेक्स रॅकेटचे ट्विटरवरून बिंग फुटले

टॅग्स :Rafale Dealराफेल डीलindian air forceभारतीय हवाई दलFranceफ्रान्सRajnath Singhराजनाथ सिंह