चिदंबरम यांच्या अटकेवर इंद्राणी मुखर्जीने दिली 'अशी'प्रतिक्रिया, म्हणाली..

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2019 03:55 PM2019-08-29T15:55:43+5:302019-08-29T16:09:24+5:30

आयएनएक्स मीडिया कथित आर्थिक गैरव्यवहार  प्रकरणी पी.चिदंबरम यांना अटक म्हणजे आनंदाची बातमी असल्याची प्रतिक्रिया शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी हिने दिली आहे.

Indrani Mukerjea Told Good News Of P Chidambaram Arrest In Inx Media Case | चिदंबरम यांच्या अटकेवर इंद्राणी मुखर्जीने दिली 'अशी'प्रतिक्रिया, म्हणाली..

चिदंबरम यांच्या अटकेवर इंद्राणी मुखर्जीने दिली 'अशी'प्रतिक्रिया, म्हणाली..

Next

मुंबई: आयएनएक्स मीडिया कथित आर्थिक गैरव्यवहार  प्रकरणी पी.चिदंबरम यांना अटक म्हणजे आनंदाची बातमी असल्याची प्रतिक्रिया शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी हिने दिली आहे.

 इंद्राणी मुखर्जी आयएनएक्स मीडियाच्या  प्रमोटर होत्या. तसेच सध्या त्या शीना बोराच्या हत्येप्रकरणी तुरूंगात आहे. त्यांना चिदंबरांच्या अटकेबद्दल जेव्हा पत्रकारांकडून  विचारण्यात आले तेव्हा इंद्राणीने पी.चिदंबरम यांना अटक झाल्याने मला आनंद झाल्याचे सांगितले. तसेच इंद्राणी मुखर्जी देखील आयएनएक्स मीडिया प्रकरणात सहआरोपी आहे.

सीबीआय आणि ईडीने आयएनएक्स मीडिया घोटाळाप्रकरणी इंद्राणी मुखर्जी आणि तिचा पति पीटर मुखर्जीची चौकशी करण्यात आली होती. त्यांच्या या चौकशीनंतर त्यांनी पी. चिदंबरम यांच्या सहमतीने हा घोटाळा झाल्याची कबुली दिली होती. त्यामुळे चिदंबरम यांच्या अटकेसाठीही इंद्राणी मुखर्जी यांचा जबाब महत्वाचा ठरल्याचे सांगण्यात येत आहे.
 

Web Title: Indrani Mukerjea Told Good News Of P Chidambaram Arrest In Inx Media Case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.