मध्य प्रदेशातील इंदूर येथील बंगाली स्क्वेअर परिसरात नुकत्याच घडलेल्या भीषण अग्निकांडाला आता एक नवे वळण मिळाले आहे. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील ८ जणांचा मृत्यू झाला असून, या आगीसाठी इलेक्ट्रिक कार कारणीभूत असल्याच्या चर्चांना पीडित कुटुंबाने पूर्णपणे फेटाळून लावले आहे.
घटनेतून बचावलेले मनोज पुगालिया यांचे सुपुत्र सौरभ पुगालिया यांनी सांगितले की, ज्या कारबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत, ती कार घटनेच्या रात्री चार्जिंगला लावलेलीच नव्हती. पुगालिया कुटुंबाकडून ही कार नियमित चार्ज केली जात असे, मात्र योगायोगाने घटनेच्या रात्री ती चार्जिंगला लावलेली नव्हती. त्यामुळे शॉर्ट सर्किट कारमधून झाल्याचा प्रश्नच उद्भवत नाही. उपलब्ध व्हिडिओ पुराव्यांचा हवाला देत सौरभने सांगितले की, सर्वप्रथम परिसरातील एका विजेच्या खांबावर स्फोट झाला आणि त्यानंतर आग पसरली.
सौरभने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आग लागल्यावर तातडीने वीजपुरवठा खंडित करणे आणि गॅस वाहिनी बंद करणे आवश्यक होते, जे प्रशासनाने केले नाही. वीजपुरवठा सुरू असतानाच पोलिसांनी पाण्याचा मारा सुरू केला. अखेरीस सौरभने स्वतः विनंती केल्यानंतर गॅस वाहिनी बंद करण्यात आली. जर ही वाहिनी वेळेत बंद झाली नसती, तर संपूर्ण कॉलनीला धोका निर्माण झाला असता.
या हृदयद्रावक घटनेत पुगालिया आणि त्यांच्या नातेवाईकांमधील आठ सदस्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेत मनोज पुगालिया त्यांची सून- सिमरन, मेहुणे- विजय आणि त्यांची पत्नी सुमन, मुलगी- रुचिका आणि नांतवंड- कार्तिक, राशि आणि तनय यांचा मृत्यू झाला. या भीषण आगीतून मनोज यांची पत्नी सुनिता आणि दोन मुलगे- सौरभ आणि बाबू कसाबसा जीव वाचवून सुखरूप बाहेर पडले. याप्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्युची नोंद केली असून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.
Web Summary : Indore fire victims' family denies electric car link, citing power pole explosion. They question delayed safety measures, alleging delayed power cut-off and gas line closure endangered the colony. Eight family members tragically died in the blaze.
Web Summary : इंदौर आग पीड़ितों के परिवार ने इलेक्ट्रिक कार के संबंध से इनकार किया, बिजली के खंभे में विस्फोट का हवाला दिया। उन्होंने सुरक्षा उपायों में देरी पर सवाल उठाया, बिजली कटौती और गैस लाइन बंद करने में देरी से कॉलोनी खतरे में पड़ गई। आग में आठ परिवार के सदस्यों की दुखद मौत हो गई।