शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
9
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
10
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
12
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
13
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
14
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
15
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
16
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
17
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
18
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
19
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
20
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

इंदूर सहाव्यांदा ठरले 'सर्वात स्वच्छ' शहर, सुरत दुसऱ्या तर मुंबई तिसऱ्या स्थानावर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2022 20:13 IST

Indore : इंदूरनंतर सुरत दुसऱ्या तर मुंबई तिसऱ्या क्रमांकावर आहे. स्वच्छ शहर सर्वेक्षणाचा निकाल शनिवारी जाहीर झाला.

नवी दिल्ली : केंद्राच्या वार्षिक सर्वेक्षणात इंदूर सलग सहाव्यांदा सर्वात स्वच्छ शहर ठरले आहे. इंदूरनंतर सुरत दुसऱ्या तर मुंबई तिसऱ्या क्रमांकावर आहे. स्वच्छ शहर सर्वेक्षणाचा निकाल शनिवारी जाहीर झाला. 'स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार 2022' सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या राज्यांमध्ये मध्य प्रदेशने प्रथम क्रमांक पटकावला असून त्यानंतर छत्तीसगड आणि महाराष्ट्राचा क्रमांक लागतो.

इंदूर आणि सुरतने यावर्षी मोठ्या शहरांच्या श्रेणीत आपले अव्वल स्थान कायम राखले आहे, तर विजयवाडा यांनी तिसरे स्थान गमावले आहे. त्यानंतर नवी मुंबईला ही जागा मिळाली. सर्वेक्षणाच्या निकालांनुसार, त्रिपुरा 100 पेक्षा कमी शहरी स्थानिक संस्था असलेल्या राज्यांमध्ये अव्वल आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शनिवारी येथे एका कार्यक्रमात विजेत्यांना पुरस्कार प्रदान केले. यावेळी केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री हरदीप सिंग पुरी आणि इतरही उपस्थित होते.

गंगेच्या काठावरील शहरांची स्थिती एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या शहरांच्या श्रेणीत महाराष्ट्रातील पाचगणी पहिल्या क्रमांकावर आहे. त्यापाठोपाठ छत्तीसगडमधील पाटण (एनपी) आणि महाराष्ट्रातील कराड यांचा क्रमांक लागतो. एक लाखाहून अधिक लोकसंख्येच्या श्रेणीत हरिद्वार हे गंगेच्या काठावरील सर्वात स्वच्छ शहर राहिले. त्यानंतर वाराणसी आणि ऋषिकेशचा क्रमांक लागतो. सर्वेक्षणाच्या निकालांनुसार, एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या गंगेच्या काठावर वसलेल्या शहरांमध्ये बिजनौर पहिल्या स्थानावर आहे. त्यानंतर अनुक्रमे कन्नौज आणि गडमुक्तेश्वर आहे.

देवलाली सर्वात स्वच्छ कॅन्टोन्मेंट बोर्डया सर्वेक्षणात महाराष्ट्रातील देवलाली हे देशातील सर्वात स्वच्छ कॅन्टोन्मेंट बोर्ड ठरले आहे. स्वच्छ भारत मिशनच्या (शहरी) प्रगतीचा अभ्यास करण्यासाठी आणि विविध स्वच्छता मानकांच्या आधारे शहरी स्थानिक स्वराज्य संस्था (ULB) श्रेणीबद्ध करण्यासाठी स्वच्छ सर्वेक्षणाची सातवी आवृत्ती आयोजित करण्यात आली होती.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशMumbaiमुंबईSuratसूरत