शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: जबरदस्त! 70 वर्षांच्या आजींवर 2-DG औषधाचा परिणाम, एकाच तासात ऑक्सिजन लेवल 94 वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2021 16:52 IST

2-डीजी हे, जगभरात प्रामुख्याने कोरोनावरील उपचारांसाठी तयार करण्यात आलेल्या औषधांपैकी एक आहे. मात्र, कोरोनाचा अद्याप कुठलाही परफेक्ट इलाज नाही.

इंदूर - कोरोना व्हायरसने संपूर्ण देशात थैमान घातले आहे. कोरनाचा सामना करण्यासाठी वैज्ञानिक मंडळी नवनवीन ओषधी तयार करत आहेत. त्यांचा प्रयोगही सुरू आहे. नुकतेच संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (DRDO) 2-डीऑक्सी-डी ग्लूकोज (2-DG) नावाचे औषध तयार केले आहे. या औषधाकडे सर्वच जण मोठ्या आशेने पाहत आहेत. मध्य प्रदेशातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या 70 वर्षीय महिलेला हे औषध देण्यात आले. यानंतर संबंधित महिलेवर या औषधाचा अत्यंत चांगला परिणाम झाल्याचे दिसून आले आहे.

संबंधित महिलेला हे औषध दिल्यानंतर त्यांच्या ऑक्सिजन पातळीत 94 पर्यंत सुधारणा झाल्याचे दिसून आले. आता त्यांना बाहेरून देण्यात येणाऱ्या ऑक्सिजनचे प्रमाणही कमी करण्यात आले आहे. हे औषध बाजारात सर्वांसाठी उपलब्ध नाही. तर ते केवळ वृद्धांसाठी चाचणी तत्त्वावर उपलब्ध करून देण्यात आले होते. संबंधित महिलेच्या कुटुंबीयांनी डीआरडीओकडे औषध पुरविण्याची विनंती केली होती. यानंतर हे औषध उपलब्ध झाले असल्याचे सांगण्यात येते. 

2DG Medicine: शरीरात जाताच कोरोनावर वार; DRDO च्या 2DG चा डोस, साईडइफेक्ट आणि किंमत...जाणून घ्या

यासंदर्भात बोलताना पियूष गोयल यांनी सांगितले, त्याची आई संतोष गोयल यांना यापूर्वी कोरोना झाला होता. काही दिवसांनी त्यांनी कोरोनावर मात केली. प्रकृती व्यवस्थित झाल्यानंतर त्यांना घरी आणण्यात आले. मात्र, काही दिवसांनंतर त्यांना पोस्ट कोविडचा परिणाम जाणवू लागला. यामुळे त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. विशेष म्हणजे जवळपास दीड महिन्यांपासून त्या खासगी रुग्णालयात आहेत.

पियूष गोयल म्हणाले, की त्यांच्या आईला बीपी आणि शुगरचा त्रास आहे. एवढेच नाही, तर यापूर्वी त्यांना कर्करोगही झाला होता. मात्र, आता झालेल्या कोरोनामुळे त्यांची ऑक्सिजन पातळी वाढत नव्हती. डॉक्टरांनी बरेच प्रयत्न करूनही फरक पडत नसल्याने, अखेर आम्ही यासंदर्भात डीआरडीओला माहिती दिली आणि त्यांच्याकडून 2-DG औषधाची चाचणीसाठी म्हणून मागणी केली. यावर आम्हाला या औषधाचे चार डोस मिळाले होते. यानंतर रविवारी संयंकाळी आईला पहिला तर सोमवारी दुसरा डोस देण्यात आला. यासंदर्भात एक व्हिडिओदेखील प्रसिद्ध करण्यात आला आहे. या व्हिडिओत वृद्ध महिलेवर उपचार करणार्‍या डॉक्टरचे म्हणणे आहे की, औषध देण्यापूर्वी रुग्णाला 14 लिटर ऑक्सिजन देण्यात येत होता. त्यावेळी त्यांची ऑक्सिजन पातळी 92 होती. एक तासानंतर औषधाचा प्रभाव दिसायला सुरूवात झाली. एक तास आणि 10 मिनिटांनंतर त्यांची ऑक्सिजन पातळी वाढून 94 टक्के झाली. याच बरोबर ऑक्सिजनही प्रति मिनिट 10 लिटरपर्यंत कमी झाल्याचे दिसून आले.

सर्वप्रथम 110 रुग्णांवर करण्यात आली होती औषधाची ट्रायल -ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) या औषधाच्या आपत्कालीन वापराला मंजुरी दिली आहे. डीआरडीओच्या इनमास लॅबच्या वैज्ञानिकांनी डॉक्टर रेड्डी लॅब्सच्या सोबतीने हे औषध तयार केले आहे. महत्वाचे म्हणजे,  डीआरडीओने सर्वप्रथम जवळपास 110 रुग्णांवर या औषधाची ट्रायल केली आहे आणि सर्वांचेच निकाल चांगले आले होते.

Coronavirus: डीआरडीओने विकसित केली Dipcovan अँटीबॉडी डिटेक्शन किट, असं करते काम, किंमत केवळ...

2-डीजी हे, जगभरात प्रामुख्याने कोरोनावरील उपचारांसाठी तयार करण्यात आलेल्या औषधांपैकी एक आहे. मात्र, कोरोनाचा अद्याप कुठलाही परफेक्ट इलाज नाही. कोरोनावरील उपचारासाठी डॉक्टर अनेक प्रायोगिक औषधांचा आणि पद्धतींचा वापर करत आहेत. यात, रेमडेसिव्हिर, इव्हरमेक्टिन, प्लाझ्मा थेरपी आणि काही स्टिरॉइड्सचा समावेश आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलMadhya Pradeshमध्य प्रदेशDRDOडीआरडीओ