व्यक्तीश:, राखीव मतदारसंघात ६२ टक्क्यांवर मतदान
By Admin | Updated: February 7, 2016 22:46 IST2016-02-07T22:46:10+5:302016-02-07T22:46:10+5:30
जळगाव- तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाच्या (शेतकी संघ) निवडणुकीत व्यक्तीश: व राखीव मतदारसंघांसाठी ६२ टक्क्यांवर मतदान झाले आहे. ८ रोजी निकाल जाहीर होणार असून, सर्वसामान्य शेतकरी पॅनल सत्ता काबीज करील, असे भाकीत वर्तविण्यात आले आहे.

व्यक्तीश:, राखीव मतदारसंघात ६२ टक्क्यांवर मतदान
ज गाव- तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाच्या (शेतकी संघ) निवडणुकीत व्यक्तीश: व राखीव मतदारसंघांसाठी ६२ टक्क्यांवर मतदान झाले आहे. ८ रोजी निकाल जाहीर होणार असून, सर्वसामान्य शेतकरी पॅनल सत्ता काबीज करील, असे भाकीत वर्तविण्यात आले आहे. संघाच्या १५ जागांसाठी रविवारी मतदान प्रक्रिया पार पडली. सात केंद्रांवर मतदान झाले. कानळदा, प.न.लुंकड कन्या शाळा, जळगाव आणि वावडदा येथे सात मतदान केंद्र स्थापन करण्यात आले होते.व्यक्तीश: मतदारसंघात तीन, संस्थामध्ये सात, महिला राखीवमध्ये दोन तर एससी/एसटी, इतर मागासवर्गीय (ओबीसी) आणि व्हीजेएनटी मतदारसंघात अनुक्रमे एका जागेसाठी मतदान झाले. व्यक्तीश: मतदारसंघा ३०३२ मतदार होते. त्यात फक्त १८५९ मतदारांनी मतदान केले. संस्था मतदारसंघात ७२ पैकी ७२ मतदारांनी मतदान केले. म्हणजेच या मतदारसंघात १०० टक्के मतदान झाले. तर राखीव जागांसाठी ३१०४ पैकी १९२१ मतदारांनी मतदान केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अशोक बागल यांनी दिली. प्रक्रिया पार पाडण्यासाठी बागल यांच्यासह वासुदेव पाटील, डी.व्ही.पाटील, धीरज पाटील यांनी कार्यवाही केली. दुपारी जिल्हा उपनिबंधक संजय राऊत यांनी मतदान केंद्रांना भेट दिली. निकालाबाबत उत्सुकतानिकाल ८ रोजी दुपारी १२ पर्यंत हाती येतील. देखरेख संघाच्या सभागृहात मतमोजणी होणार आहे. सात टेबल असतील. त्यासाठी २१ कर्मचारी नियुक्त केले आहेत. प्रथम व्यक्तीश: मतदारसंघाच्या मतमोजणीला सुरुवात होईल. नंतर राखीव मतदारसंघांबाबत मतमोजणी होईल. शेवटी संस्था मतदारसंघाची मतमोजणी केली जाईल. लकी टेलर यांच्याकडे सत्ता येण्याचे संकेतनिवडणुकीत लक्ष्मण पाटील (लकी टेलर) यांचे सर्वसामान्य शेतकरी पॅनल व भाऊसाहेब पाटील यांचे सहकार विकास पॅनलमध्ये लढत झाली. लकी टेलर यांनी सर्व १५ जागांसाठी उमेदवार उतरविले होते. तर भाऊसाहेब पाटील यांच्या पॅनलचा संस्था मतदारसंघात पाच आणि व्यक्तीश: मतदारसंघात एकच उमेदवार होता. निकाल सर्वसामान्य शेतकरी पॅनलच्या बाजूने येईल. या पॅनलला १३ जागा मिळतील. अर्थातच लकी टेलर यांच्याकडे सत्ता येईल, असे जाणकारांनी सांगितले.