शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2017 21:41 IST

माजी पंतप्रधान आणि ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांना या वर्षीचा इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे.

नवी दिल्ली - माजी पंतप्रधान आणि ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांना या वर्षीचा इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. शांतता, नि:शस्त्रीकरण आणि विकास या क्षेत्रांतील भरीव कामगिरीसाठी हा पुरस्कार दरवर्षी इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्टकडून दिला जातो. 2004 ते 2014 या काळात देशाचं पंतप्रधानपद सांभाळताना  मनमोहन सिंग यांनी देशाचा मान जगभरात वाढवला. त्यासाठी  माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने मनमोहन सिंग यांच्या नावाची इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड केली. १० वर्षांच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत भारताच्या आर्थिक-सामाजिक विकासात दिलेले भरीव योगदान, जगात भारताची प्रतिष्ठा उंचावणे, शेजारी व जगातील इतर महत्त्वाच्या देशांची सलोख्याचे संबंध प्रस्थापित करणे आणि दर्म, जात, भाषा वा पंथ यांचा विचार न करता सर्व सामान्य नागरिकांचे समाधान व सुरक्षेसाठी ससत झटणे यासाठी डॉ. मनमोहन सिंग यांना गौरविण्यात येत असल्याचे ट्रस्टने म्हटले.सलग पाच वर्षांचे दोन कालखंड यशस्वीपणे पूर्ण करणारे डॉ. सिंग हे भारताचे तिसरे पंतप्रधान आहेत व अमेरिकेसोबत झालेला नागरी अणु सुरक्षा करार व कोपनहेगन येथे झालेला जागतिक हवामान बदलाविषयीचा समझौता ही त्यांची भरीव कामगिरी ठरली, असेही ट्रस्टने नमूद केले. 

टॅग्स :Manmohan Singhमनमोहन सिंगIndira Gandhiइंदिरा गांधी