शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

इंडिगोने दिव्यांग मुलाला विमानात चढण्यापासून रोखले, ज्योतिरादित्य सिंधिया यांनी घेतली गंभीर दखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2022 15:52 IST

इंडिगो एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांनी 7 मे रोजी रांची विमानतळावर एका दिव्यांग मुलाला विमानात तढण्यापासून रोखले होते. त्याची ज्योतिरादित्य सिंधिया यांनी गंभीर दखल घेतली असून, ते स्वतः या प्रकरणाची चौकशी करणार आहेत.

नवी दिल्ली: इंडिगो एअरलाइनने दिव्यांग मुलाला विमानात बसण्यास नकार दिल्याच्या घटनेची केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी गंभीर दखल घेतली आहे. ते स्वतः या प्रकरणाची चौकशी करणार आहेत. कोणत्याही विमान कंपनीकडून प्रवाशांशी अशी वागणूक अजिबात खपवून घेतली जाणार नाही, असे त्यांनी सोमवारी सकाळी स्पष्ट केले.  

इंडिगो एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांनी 7 मे रोजी रांची विमानतळावर एका दिव्यांग मुलाला विमानात चढण्यापासून रोखल्याचा आरोप आहे. मुलगा त्याच्या आई-वडिलांसोबत होता. या कुटुंबाला हैदराबादला जायचं होते. कंपनीने दिव्यांग मुलाला विमानात चढण्यापासून रोखल्यानंतर त्याच्या पालकांनाही विमानात बसता आले नाही. इंडिगोने याचे कारण सांगितले की, मूल विमानात प्रवास करताना घाबरले होते. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे प्रमुख अरुण कुमार यांनी सोमवारी पीटीआयला सांगितले की, विमान वाहतूक नियामकाने याप्रकरणी इंडिगोकडून अहवाल मागवला आहे. त्यांनी सांगितले की डीजीसीए या घटनेची चौकशी करुन योग्य ती कारवाई करेल.

मनीषा गुप्ता नावाच्या प्रवाशाने लिंक्डइनवर या घटनेबद्दल लिहिलेमनीषा गुप्ता नावाच्या प्रवाशाने लिंक्डइनवर या घटनेची सविस्तर माहिती दिली आहे. त्या म्हणाले की, शनिवारी रांची विमानतळावर एका दिव्यांग तरुणाची गैरसोय झाली. विमानतळापर्यंतच्या प्रवासातून आलेला थकवा, सुरक्षा तपासणीचा ताण आणि भुकेने अस्वस्थ झाल्यामुळे तो गोंधळला. पण, त्याच्या पालकांनी त्याला शांत केले. विमानात बसण्यापूर्वी मुलाला खाऊ घालून औषधे देण्यात आली. पण, नंतर इंडिगोच्या कर्मचार्‍यांनी मुलाला विमानात चढू दिले जाणार नाही, असे सांगितले. इतर प्रवाशांनी याला कडाडून विरोध करत मुलाला आणि त्याच्या पालकांना लवकरात लवकर विमानात बसण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली. 

टॅग्स :Jyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदेIndigoइंडिगोairplaneविमान