इंडिगोच्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी
By Admin | Updated: March 23, 2016 17:31 IST2016-03-23T17:31:32+5:302016-03-23T17:31:32+5:30
इंडिगो कंपनीच्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी एका अज्ञात व्यक्तीने फोनवरुन बुधवारी दिली. श्रीनगरहून दिल्लीला येणा-या इंडिगोच्या विमानात बॉम्ब ठेवला असल्याची

इंडिगोच्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी
>ऑनलाइन लोकमत
दिल्ली, दि. २३ - इंडिगो कंपनीच्या विमानात बॉम्ब असल्याची धमकी एका अज्ञात व्यक्तीने फोनवरुन बुधवारी दिली.
श्रीनगरहून दिल्लीला येणा-या इंडिगोच्या विमानात बॉम्ब ठेवला असल्याची धमकी इंडिगो कंपनीच्या चेन्नई येथील कार्यालयात दुपारी एका अज्ञात व्यक्तीकडून देण्यात आली. त्यानंतर लगेचच दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान लॅण्ड करण्यात आले.
विमान लॅण्ड करण्यात आल्यानंतर विमानातील प्रवाशांना सुरक्षित ठिकाणी नेऊन सुरक्षा यंत्रणेकडून विमानाची तपासणी करण्यात आली. दरम्यान, या विमानात कोणतीही संशयित वस्तू आढळली नसून ही अफवा असल्याचे समजते.