इंडिगो विमानातील प्रवाशाने अचानक उघडला दरवाजा, एक जखमी
By Admin | Updated: February 10, 2017 18:01 IST2017-02-10T16:42:01+5:302017-02-10T18:01:20+5:30
इंडिगो विमानातील प्रवाशाने विमान टेक ऑफ करत असतानाच एमर्जन्सी दरवाजा उघडल्याने मुंबई विमानतळावर काही वेळासाठी धावपळ सुरु झाली होती

इंडिगो विमानातील प्रवाशाने अचानक उघडला दरवाजा, एक जखमी
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 10 - इंडिगो विमानातील प्रवाशाने विमान टेक ऑफ करत असतानाच इमर्जन्सी दरवाजा उघडल्याने मुंबई विमानतळावर काही वेळासाठी धावपळ सुरु झाली होती. दरवाजा उघडल्याने बाजूला बसलेला प्रवासी जखमी झाला आहे. हे विमान मुंबईहून चंदिगडला जात होतं. सुरक्षेचं उल्लंघन केल्याप्रकरणी प्रवाशाविरोधात पोलीस तक्रार करण्यात आली आहे.
सकाळी 11 वाजता विमान धावपट्टीवर असताना सीट क्रमांक 12-C वरील प्रवाशाने अचानक एमर्जन्सी दरवाजा उघडला. यानंतर क्रू मेम्बर्सने लगेचच वैमानिकाला याची माहिती दिली.
या प्रकारामुळे 12A सीटवरील प्रवाशाला काही जखमा झाल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच वैमानिकाने ग्राऊंड स्टाफला याची माहिती दिली आणि वैद्यकीय सेवेची व्यवस्था करायला सांगितल्याचं इंडिगोने सांगितलं आहे. विमानात एकूण 176 प्रवासी प्रवास करत होते. प्रवाशाला विमातळाच्या सुरक्षेची जबाबदारी असणा-या सीआयएसएफच्या हवाली करण्यात आलं आहे.