राजस्थानातील जोधपूरवरून कर्नाटकातील बंगळुरूला निघालेल्या विमानात गोंधळ उडाला. विमान उड्डाणासाठी सज्ज झालेले असतानाच एका प्रवाशाने विमानाचा आपतकालीन दरवाजा उघडला. त्यामुळे विमानाचे उड्डाण रोखण्यात आले. या प्रकरणी प्रवाशाला विमानतळ सुरक्षा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्याने चौकशी काय घडलं ते सांगितलं.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सकाळी १०.१० वाजताची जोधपूरवरून बंगळुरूसाठी इंडिगोचे विमान उड्डाण करणार होते. एअर होस्टेसने प्रवाशांना सूचना दिल्या. त्यानंतर सुरक्षेसंदर्भातील डेमो झाला. विमान उड्डाण करण्यासाठी सज्ज असतानाच एका प्रवाशाने इमर्जन्सी दरवाजा उघडला.
ऐन उड्डाणावेळी अचानक इमर्जन्सी एक्झिटचे बटण दाबल्याने गोंधळ उडाला. त्यानंतर विमानातील कर्मचाऱ्यांनी प्रवाशाला केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या ताब्यात दिले. सिराज किडवई, असे त्या प्रवाशाचे नाव असून, तो अॅक्सिस बँकेत नोकरी करतो.
चौकशीत त्याने सांगितले की, 'इमर्जन्सी एक्झिट दरवाजा अनावधानाने उघडला केला. त्याच्या या कृत्यामुळे विमानाचे उड्डाण थांबवले गेले. त्याला विमानातून उतरवण्यात आले.
इंडिगोने काय म्हटले आहे?
हवाई वाहतूक कंपनी इंडिगोने याबद्दल माहिती देताना सांगितले की, "आज उड्डाणापूर्वी सुरक्षा आढावा घेताना 6E 6033 या विमानातील एका प्रवाशाने इमर्जन्सी एक्झिट उघडले. त्यानंतर विमानातील कर्मचाऱ्यांनी एसओपीचे पालन केले. प्रवाशाला विमानातून उतरवून सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले. या प्रकरणाचा पुढील तपास सुरक्षा यंत्रणांचे अधिकार करत आहेत."