शहरं
Join us  
Trending Stories
1
"२२ आमदार मुख्यमंत्र्याच्या हाती लागलेत..."; आदित्य ठाकरेंचा दावा, कुणावर साधला निशाणा?
2
जिनांच्या दबावापुढे काँग्रेसने गुडघे टेकले; 'वंदे मातरम्'वरील चर्चेदरम्यान PM मोदींचा घणाघात
3
लाखोंचं एक-एक टी शर्ट विकणारं Versace का बुडालं; कोणी खरेदी केला ब्रँड, २०२५ ची 'मेगा-डील'
4
SMAT: डेब्यू सामन्यातच मोठा धमाका, ५५ चेंडूत ११४ धावा ठोकल्या; कोण आहे अमित पासी?
5
भगवद्गीतेची पुतिन यांनाही भुरळ, भारतातून परतताना विमानात केले वाचन; PM मोदींचा मान राखला!
6
Pune Crime: "माझ्या बहिणीसोबतचे प्रेमसंबंध तोड", रागावलेल्या बॉयफ्रेंडने २९ वेळा वार करत सोन्याला संपवले  
7
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील पाचपट! फिरतानाही दिसेल भारतीय संस्कृतीची झलक
8
तुमच्या पेन्शन ठेवींवर तुम्हाला व्याज मिळते का? पीएफ आणि EPS साठीच्या नियमात तुमचाही गोंधळ होतो?
9
'इंडिगो' प्रकरणानंतर सरकार सावध, अशी समस्या पुन्हा उद्भवू नये यासाठी केंद्राची राज्यसभेतून मोठी घोषणा
10
हळूहळू दिवाळखोर होतोय अमेरिका! डोनाल्ड ट्रम्प यांच्या राजवटीत १५ वर्षांचा विक्रम मोडला
11
हुमायूं कबीर नव्हे, ममतांनीच केली बाबरी मशिदीची पायाभरणी! भाजपचा मोठा आरोप
12
Video - कडक सॅल्यूट! पॅरालाइझ्ड आहे, कमकुवत नाही... ५२ वर्षीय Zepto डिलिव्हरी वुमन
13
'बोल्डनेस'चा कहर! युवराज सिंगसोबत समुद्राच्या मधोमध फोटोशूट, जाणून घ्या 'ती' सुंदरी कोण?
14
माझ्या बहिणीची हत्या करण्यात आलीये, पती आणि सासऱ्याने तिचा...; सरिता अग्रवाल यांच्या भावाचे गंभीर आरोप
15
IndiGo: प्रवाशांचे हाल, तिकीट खिडकीवर गोंधळ, विमानतळांवर सामानाचा ढिग; पाहा फोटो!
16
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; पाहा १४ ते २४ कॅरट Gold ची लेटेस्ट किंमत
17
नागपूर अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची भास्कर जाधव, पटोलेंची मागणी, फडणवीसांनी दिलं असं उत्तर
18
"लगेच मदत मिळाली असती तर.."; लखनौ विमानतळावर वाट बघत राहिले अन् त्यांना मृत्यूनं गाठलं!
19
"मालती कशी वाटली?", प्रणित मोरेच्या वडिलांची प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाले- "त्या दोघांमध्ये..."
20
गंभीर आरोप, शा‍ब्दिक चकमक; निलेश राणे आणि रवींद्र चव्हाण नागपुरात आले समोरा-समोर
Daily Top 2Weekly Top 5

'इंडिगो' प्रकरणानंतर सरकार सावध, अशी समस्या पुन्हा उद्भवू नये यासाठी केंद्राची राज्यसभेतून मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 15:23 IST

Indigo Flight Crisis: इंडियोसारखं विमान संकट पुन्हा निर्माण होऊ नये, यासाठी केंद्र सरकारने कंबर कसली आहे. तसेच या विमान संकटाच्या पार्श्वभूमीवर नागरी हवाई वाहतूकमंत्री राममोहन नायडू यांनी केंद्र सरकारच्या वतीने राज्यसभेमध्ये मोठं विधान केलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून देशातील प्रमुख विमान वाहतूक कंपनी असलेल्या इंडिगोची शेकडो उड्डाणं रद्द होत असल्याने त्याचा फटका लाखो प्रवाशांना बसत आहे. या विमान संटकामुळे विमानतळांवर तासनतास होत असलेला खोळंबा, इतर विमानांचे भडकलेले तिकीटदर यामुळे केंद्र सरकारलाही टीकेचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर इंडियोसारखं विमान संकट पुन्हा निर्माण होऊ नये, यासाठी केंद्र सरकारने कंबर कसली आहे. तसेच या विमान संकटाच्या पार्श्वभूमीवर नागरी हवाई वाहतूकमंत्री राममोहन नायडू यांनी केंद्र सरकारच्या वतीने राज्यसभेमध्ये मोठं विधान केलं आहे.

राममोहन नायडू म्हणाले की, इंडिगोमध्ये जी गडबड होत आहे, ती कुठल्याही सरकारी चुकीमुळे नाही तर या विमान कंपनीकडून निर्माण करण्यात आलेली ऑपरेशन समस्या आहे. नागरी हवाई वाहतूक मंत्रालय सातत्याने इंडिगोच्या संपर्कात होतं. तसेच १ नोव्हेंबर रोजी झालेल्या बैठकीत नव्या वैमानिक ड्युटी नियमांबाबत एअरलाईनकडून विचारण्यात आलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर स्पष्टपणे दिलं गेलं होतं. इंडिगो कंपनी आपलं रोस्टर सांभाळू शकली नाही. ही चूक स्पष्टपणे इंडिगोच्या अंतर्गत व्यवस्थेशी संबंधित आहे.

राममोहन नायडू यांनी पुढे सांगितले की, भविष्यात अशी समस्या निर्माण होऊ नये यासाठी इंडिगोमधील या ऑपरेशनल चुकांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये तयार करण्यात आलेले वैमानिकांच्या ड्युटीचे नियम १ नोव्हेंबरपासून लागू झाले असून, त्यानुसार प्रत्येक कंपनीला ते लागू करणे बंधनकारक होते. या माध्यमातून केवळ इंडिगोच नाही तर सर्वच हवाई वाहतूक क्षेत्राला एक उदाहरण प्रस्तूत केलं जाईल, असेही नायडू यांनी सांगितले.  तसेच आम्ही वैमानिक आणि संपूर्ण सिस्टिमच्या सुरक्षेसाठी गंभीर आहोत. त्यामुळे सर्व विमान कंपन्यांना या नियमांचं पालन करावंच लागेल, असेही नायडू यांनी स्पष्ट केलं.

मार्केट कॅपमध्ये मोठी घसरणदेशातील सर्वात मोठी एअरलाइन इंडिगो एका मोठ्या ऑपरेशनल संकटातून जात आहे. यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणावर उड्डाणं रद्द करावी लागली असून आता त्यांना सरकारी कारवाईचा सामनाही करावा लागू शकतो. गेल्या आठवड्यापासून सुरू झालेल्या या संकटामुळे अनेक प्रवाशांना त्रास झाला आहे आणि कंपनीच्या प्रतिमेलाही नुकसान पोहोचलं आहे. तेव्हापासून आतापर्यंत त्यांचे शेअर्स १६% नं घसरले आहेत. या दरम्यान कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये ३७,००० कोटी रुपयांची मोठी घट झाली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Government acts after Indigo crisis, announces probe in Rajya Sabha.

Web Summary : After Indigo flight cancellations, the government orders an inquiry into operational errors. Minister Naidu stated Indigo's issues weren't due to government fault. New pilot duty rules are enforced to prevent future crises. Indigo's market cap significantly declined amidst the operational turmoil.
टॅग्स :IndigoइंडिगोairplaneविमानCentral Governmentकेंद्र सरकार