शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर शिवसैनिक तुम्हाला पळवून लावतील"; शिंदेसेनेचा भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांना इशारा
2
सडकून ताप, अंगदुखी अन् अचानक मृत्यू! जंगलात राहणाऱ्या 'या' किड्याने घातला राज्यभरात धुमाकूळ
3
महापालिका निवडणुकीच्या तयारीला झाली सुरुवात, नागपूर आणि चंद्रपूरसाठी नव्याने आरक्षण सोडत
4
भयंकर! "माझ्यापेक्षा सुंदर कोणीच असू नये"; ४ लहान मुलांना मारणाऱ्या सायको किलरचा पर्दाफाश
5
१० वर्षात १ कोटींच्या निधीचं स्वप्न पूर्ण करायचंय? जाणून घ्या दर महिन्याला किती करावी लागेल SIP
6
गोंदियात EVM चं सील तोडल्याचा आरोप तर सांगलीत रातोरात मतदान वाढल्याचा दावा; स्टाँगरूमबाहेर राडा
7
पुणे पोलिसांनी अटक केलेली शीतल तेजवानी कोण? पार्थ पवारांच्या कंपनीसोबत केला होता जमिनीचा व्यवहार
8
इंडिगोची 'साडेसाती' संपेना... आज एकाच दिवशी तब्बल १००हून जास्त उड्डाणे रद्द, गोंधळ सुरूच
9
Sunny Leone : 'बेबी डॉल' झळकली शेतात; सनी लिओनीचे फोटो शेतकऱ्यांनी चक्क बांधावर लावले, कारण...
10
प्रणित मोरे 'बिग बॉस १९'चा विजेता? फिनालेआधीच हातात ट्रॉफी घेतलेला फोटो होतोय व्हायरल
11
पुतिन यांच्या भेटीपूर्वी युरोपने भारताला युद्ध संपवण्याचे आवाहन केले; म्हणाले, ते तुमचे ऐकतात...'
12
कोण आहे 'ती' इराणी मुलगी; जिच्यावर अमेरिकेनं लावलंय हाफिज सईद इतकं इनाम!
13
'Bata' हा भारतीय फुटवेअर ब्रँड आहे का? अनेक जण करतात ही चूक; पाहा कोणते ब्रँड्स आहेत स्वदेशी आणि कोणते विदेशी?
14
नागपूर हिवाळी अधिवेशन सात दिवसांचेच शनिवार, रविवारी कामकाज; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे सावट
15
रशियात भारतीय १०० रुपयांचे मूल्य किती! व्यापारावर याचा थेट कसा परिणाम होतो?
16
केकेआरला पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, त्यानेच मैदान गाजवलं; २१५ च्या स्ट्राइकनं केल्या धावा
17
स्मार्टफोनमध्ये संचार साथी ॲप अनिवार्य नाही; सर्व बाजूंनी टीका झाल्यानंतर सरकारची माघार
18
"मी इतकंच सांगेन की...", विजय देवरकोंडासोबत लग्नाच्या चर्चांवर रश्मिका मंदानाने सोडलं मौन
19
Video: बिहारमध्ये लग्नाच्या पंगतीत रसगुल्ले कमी पडल्यानं तुंबळ हाणामारी; वऱ्हाडी भिडले अन्...
20
मुलींसाठी LIC ची जबरदस्त स्कीम, ₹१२१ रुपयांच्या बचतीतून मिळेल लाखोंचा रिटर्न; कोणती आहे योजना?
Daily Top 2Weekly Top 5

इंडिगोची 'साडेसाती' संपता संपेना... आजच्या दिवशी तब्बल २०० विमान उड्डाणे रद्द, गोंधळ सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 11:36 IST

Indigo flights cancelled: क्रू मेंबर्सची कमतरता, समस्येमुळे प्रवाशांना मोठी गैरसोय

Indigo flights cancelled: भारतीय विमान कंपनी इंडिगो सध्या मोठ्या संकटाचा सामना करत आहे. देशभरातील अनेक विमानतळांवर त्यांची विमान उड्डाणे सतत रद्द केली जात आहेत. तशातच आज, गुरुवारी १०० हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली. काही उड्डाणे तांत्रिक समस्यांमुळे प्रभावित झाली, तर काहींना क्रू मेंबर्सची कमतरता भासत असल्याचे कारण ठरले. इंडिगोच्या या समस्येमुळे प्रवाशांना मोठी गैरसोय होत आहे.

अनेक विमान उड्डाणे शेवटच्या क्षणी रद्द

इंडिगोच्या विमानाचे बुकिंग केलेले अनेक प्रवासी बराच वेळ विमानतळावर विमानांची वाट पाहत थांबलेले दिसले. पण शेवटच्या क्षणी त्यांची विमान उड्डाणे रद्द करण्यात आल्याचे समजले. गुरुवारी हैदराबाद आणि दिल्ली विमानतळांवर लांब रांगा दिसून आल्या. त्यामुळे एअरलाइनच्या चुकीबद्दल लोक आता सोशल मीडियावर आपला संताप व्यक्त करत आहेत. इंडिगो व्यतिरिक्त, इतर अनेक विमान कंपन्या अशाच प्रकारच्या समस्यांना तोंड देत आहेत. त्यामुळे विमान प्रवासाचे भाडे खूपच वाढल्याची चिन्हे आहेत. दिल्ली ते मुंबई विमानाचे भाडे तब्बल २०,००० रुपयांपेक्षाही जास्त झाल्याचे चित्र आहे.

आतापर्यंत रद्द झालेली विमान उड्डाणे

  • बेंगळुरू- ४२
  • दिल्ली- ३८
  • अहमदाबाद- २५
  • इंदूर- ११
  • हैदराबाद- १९
  • सुरत- ८
  • कोलकाता- १०

इंडिगो एअरलाइन्सने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, खराब हवामान, सिस्टीममधील बिघाड आणि नवीन कर्मचारी नियमांमुळे उड्डाणांवर परिणाम झाला आहे. गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत आणि पुढील ४८ तासांत विमानसेवा पूर्णपणे पूर्ववत केली जाईल. इंडिगोच्या विमान सेवा बंद पडल्याने देशातील जवळजवळ प्रत्येक विमानतळावर परिणाम होत आहे. दिल्ली, बेंगळुरू, इंदूर, अहमदाबाद, हैदराबाद, वाराणसी आणि सुरत विमानतळांवर प्रवाशांना सर्वाधिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

विमान समस्या का उद्भवली?

इंडिगोचे उड्डाण रद्द होण्यामागे अनेक कारणे सांगितली जात आहेत . काहींचे म्हणणे आहे की सिस्टममधील बिघाड आणि कर्मचाऱ्यांची कमतरता ही मुख्य कारणे आहेत. तथापि, फेडरेशन ऑफ इंडियन पायलट्सने (FIP) हा दावा स्पष्टपणे नाकारला आहे. FIP च्या मते, इंडिगोच्या समस्या त्यांच्या स्वतःच्या दीर्घकालीन धोरणांमुळे आहेत. गेल्या काही वर्षांत कंपनीने जाणूनबुजून खूप कमी पायलट नियुक्त केले आहेत, ज्यामुळे अशा अडचणी निर्माण झाल्या आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Indigo's troubles continue: Hundreds of flights cancelled, chaos ensues.

Web Summary : Indigo faces major disruptions with over 200 flights cancelled due to technical issues and crew shortages. Passengers are stranded, expressing anger online. The airline cites weather and staffing changes, promising service restoration within 48 hours. Pilot shortage claims are refuted.
टॅग्स :IndigoइंडिगोBengaluruबेंगळूरdelhiदिल्लीairplaneविमान