शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटांत पाकने गुडघे टेकले, अफगाणिस्तानसमोर सपशेल शरणागती, शस्त्रे सोडून सैनिक पळाले!
2
तालिबान-पाकिस्तानमध्ये पुन्हा युद्ध, कुर्रममध्ये टँक नष्ट, चौक्या ताब्यात, दोन टीटीपी कमांडर पाकिस्तानविरुद्ध एकत्र आले
3
सचिन तेंडुलकरकडे आहे का तो स्मॉलकॅप स्टॉक ज्यानं वर्षभरात दिला १३,०००% पेक्षा जास्त रिटर्न, कंपनीनं काय म्हटलं?
4
राजकीय पक्षांचे दार चुकले; मतदार याद्यांचा विषय कक्षेत नाही; राजकीय प्रतिनिधींना आयोगाचे उत्तर
5
५ वर्षात ₹१७ लाखांचा रिटर्न; पैसा छापायची मशीन आहे पोस्टाची 'ही' स्कीम, बनवेल लखपती
6
सिलिंडरच्या स्फोटात भाजली, ११ दिवस मृत्यूशी झुंज; भारतीची शेवटची इच्छा वाचून पाणावतील डोळे
7
रशियाचा युक्रेनवर मोठा हल्ला, रुग्णालय आणि वीज प्रकल्पाचे मोठे नुकसान; सात जण जखमी
8
दिवाळीत वैभव लक्ष्मी योग: ९ राशींवर महाकृपा, धन-संपत्ती-लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, यश-शुभ काळ!
9
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, निफ्टीत ८० अंकांची तेजी; NBFC शेअर्समध्ये जोरदार तेजी
10
अग्नितांडव! बांगलादेशच्या ढाकामध्ये कपड्याच्या फॅक्ट्रीला भीषण आग; १६ कामगारांचा होरपळून मृत्यू
11
आजचे राशीभविष्य, १५ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश, हाती पैसा येईल; चांगली बातमी मिळेल
12
भयंकर! शाळेत चप्पल घातल्याने मुख्याध्यापिका संतापली; कानाखाली मारली, विद्यार्थिनीचा मृत्यू
13
ना शिधा, ना आनंद! भुजबळांनी ते धाडस दाखविले...
14
भारत-पाकच्या खेळाडूंमध्ये ‘हाय फाइव्ह’; हॉकी संघाने सामना संपल्यानंतर हस्तांदोलनही केले
15
मुंबई महापालिका निवडणूक मतपत्रिकेवर घेण्याची मागणी; राज, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची मागणी
16
बापरे, काय तो वेग...! बुलेट, रॉकेटचा नाही तर चांदीचा; एकाच दिवसात १५,००० ने वाढली 
17
ईडी कारवाई: वसईचे माजी आयुक्त अनिल पवार, गुप्ताची ७१ कोटींची मालमत्ता जप्त
18
पानसरे हत्या; तीन आरोपींना जामीन मंजूर; सर्वच आरोपी आता जामिनावर बाहेर
19
माओवादी चळवळीने हात टेकले; ‘भूपती’सह ६० जणांची शरणागती
20
इंधन भेसळ प्रकरणात जामीन देताना गंभीरतेने विचार गरजेचा; मुंबई उच्च न्यायालयाचे स्पष्ट मत, एकाचा जामीन फेटाळला

पाटण्याहून दिल्लीला जाणाऱ्या Indigo विमानाला पक्षी धडकला; १७५ प्रवासी प्रचंड घाबरले, पुढे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 12:29 IST

Indigo : सुदैवाने मोठा अनर्थ टळला.

Indigo : गेल्या काही दिवसांपासून विमानांमध्ये तांत्रिक बिघाडाच्या घटना सातत्याने घडत आहेत. अशातच, बुधवारी(दि.९) बिहारच्या पाटण्याहून दिल्लीला घेऊन जाणाऱ्या इंडिगो विमानाची इमर्जन्सी लँडिंगची घटना घडली आहे. पक्ष्याने विमानाला धडक दिल्यामुळे विमानाच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, विमानात एकूण १७५ प्रवासी होते. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट पसरली. 

सविस्तर माहिती अशी की, बुधवारी सकाळी पाटण्याहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो विमानात (उड्डाण क्रमांक IGO5009) तांत्रिक बिघाड झाला. यानंतर, विमानाला पटणाच्या जयप्रकाश नारायण आंतरराष्ट्रीय विमानतळावर परत उतरवण्यात आले. पक्षी धडकल्याने विमानाच्या एका इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती विमानतळ अधिकाऱ्यांनी दिली आहे. सुदैवाने मोठा अनर्थ टळला. 

अधिकाऱ्यांनी काय म्हटले?पाटणा विमानतळाने या घटनेबाबत एक निवेदन जारी केले, ज्यामध्ये म्हटले की, भारतीय वेळेनुसार सकाळी ८:४२ वाजता पाटणाहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाच्या उड्डाणानंतर लगेचच विमानाला पक्ष्याची धडक बसली. तपासादरम्यान, धावपट्टीवर एक मृत पक्ष्याचे तुकडे आढळले. अप्रोच कंट्रोल युनिटद्वारे विमानाला याची माहिती देखील देण्यात आली. अप्रोच कंट्रोल युनिटकडून एका इंजिनमध्ये कंपन झाल्यामुळे विमानाला पाटणाला परतण्याची विनंती करण्यात आल्याचा संदेश मिळाला. स्थानिक स्टँड-बाय घोषित करण्यात आला आणि भारतीय वेळेनुसार सकाळी ९:०३ वाजता विमान रनवे ७ वर सुरक्षितपणे उतरले.

प्रवासी घाबरलेविमानतळ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानातील सर्व १७५ प्रवासी आणि क्रू मेंबर्स सुरक्षित आहेत. उड्डाणाची तपासणी केली जाईल. प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानावर नेण्यासाठी एअरलाइन्सकडून पर्यायी व्यवस्था केली जाईल. जेव्हा ही घटना घडली, तेव्हा प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट पसरली होती.

टॅग्स :IndigoइंडिगोairplaneविमानBiharबिहारdelhiदिल्लीAirportविमानतळ