शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

किमान सहा केंद्रीय मंत्र्यांना संघटनेत पाठविण्याचे संकेत;८ ते १२ जुलै दरम्यान मंत्रिमंडळ फेरबदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2023 06:23 IST

यात वित्तमंत्री निर्मला सीतारामन, आरोग्यमंत्री मनसुखभाई मांडविया, प्रल्हादसिंह पटेल, मुरलीधरन व ज्योतिरादित्य शिंदे यांची नावे आहेत.

- संजय शर्मानवी दिल्ली : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीआधी होणाऱ्या केंद्रातील मंत्रिमंडळ विस्ताराची तयारी अंतिम टप्प्यात आहे. सूत्रांनी सांगितले की, ८ ते १२ जुलै दरम्यान कधीही फेरबदल होऊ शकतो. सरकारमधील किमान सहा मंत्र्यांना भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी बोलावून संघटनेत काम करण्याचा प्रस्ताव दिला आहे. यात वित्तमंत्री निर्मला सीतारामन, आरोग्यमंत्री मनसुखभाई मांडविया, प्रल्हादसिंह पटेल, मुरलीधरन व ज्योतिरादित्य शिंदे यांची नावे आहेत.

भाजप अध्यक्षांचे बैठकांचे सत्र 

मंगळवारी निर्मला सीतारामन यांनी नड्डा यांची भेट घेतली होती. बुधवारी सकाळी मांडविया यांना नड्डा यांनी निवासस्थानी बोलावले. प्रल्हादसिंह पटेल यांना दुपारी भाजप मुख्यालयात बोलावले. सायंकाळी शिंदे यांना बोलावले. केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांना मंगळवारीच तेलंगणाचे प्रदेशाध्यक्ष नियुक्त केले. केरळमध्ये भाजप मोठा बदल करताना दिसत आहे. केंद्रीय विदेश राज्यमंत्री मुरलीधरन यांना भाजप प्रदेशाध्यक्ष केले जाण्याची शक्यता आहे. 

सी. आर. पाटील यांना सरचिटणीसपद?

सूत्रांनी सांगितले की, सीतारामन यांना काही राज्यांचे प्रभारी केले जाऊ शकते. मांडविया यांच्याकडे गुजरात भाजपची सूत्रे जाऊ शकतात. गुजरात भाजपचे अध्यक्ष सी. आर. पाटील यांना गुजरातमधील विजयाचे बक्षीस दिले जाणार आहे. त्यांना भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस करून उत्तर प्रदेशचे प्रभारी तसेच केंद्रीय मंत्री करण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशात नोव्हेंबरमधील विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन केंद्रीय मंत्री प्रल्हादसिंह पटेल व ज्योतिरादित्य शिंदे यांचीही नड्डा यांच्याशी चर्चा झाली आहे. 

अकाली दल व भाजपच्या युतीची लवकरच घोषणा 

पंजाबचे नवनियुक्त भाजप प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांनी बुधवारी जे. पी. नड्डा यांची भेट घेतल्यानंतर पंजाबमध्ये लवकरच शिरोमणी अकाली दल व भाजपच्या युतीची घोषणा होण्याचे संकेत दिले. आगामी काही दिवसांत मोदी मंत्रिमंडळात अकाली दलाच्या एका नेत्याला सामावून घेतले जाऊ शकते. माजी केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल पुन्हा एकदा मंत्रिमंडळात सहभागी होण्याची शक्यता आहे. पंजाबमधील राज्यमंत्री झालेले सोम प्रकाश यांना हटवले जाण्याची शक्यता आहे.

टॅग्स :BJPभाजपाCentral Governmentकेंद्र सरकार