नवी दिल्ली - पश्चिम आशियात बिघडलेल्या परिस्थितीमुळे सर्वाधिक नुकसान भारताला पोहचत आहे. होर्मुझ सामुद्रधुनीतील वाहतूक ठप्प झाल्याने गॅस संकट सर्वांच्या चिंतेचा विषय बनला आहे. त्यातच इंधन तुटवड्यामुळे भारतात युरिया प्लांटमध्ये उत्पादन निम्म्यावर आले आहे. या प्लांटमध्ये गॅस पुरवठा ६० ते ६५ टक्के घटला आहे. त्यामुळे स्थिती भयंकर बनली आहे. या संकटामुळे कृषी क्षेत्रावर परिणाम होऊ शकतो. जगात भारत युरियाचा सर्वात मोठा ग्राहक आहे.
युद्धामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणाऱ्या मालवाहतुकीत व्यत्यय आला आहे. अपस्ट्रीम पुरवठादारांनी 'फोर्स मॅज्यूर'चा (अपरिहार्य परिस्थितीमुळे करारातून सूट) आधार घेतला आहे. यामुळे पेट्रोनेट एलएनजी लिमिटेडलाही आपल्या रिसिव्हिंग टर्मिनलवर तेच करण्यास भाग पडले आहे. याचा संपूर्ण पुरवठा साखळीवर परिणाम झाला. गेल (इंडिया), इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (आयओसी) आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन यांनी RasGas करारांतर्गत कार्यरत असलेल्या खत युनिट्सना होणारा गॅस पुरवठा कमी केला. गॅस पुरवठा सामान्य पातळीच्या सुमारे ६०-६५ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे असं एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
जेव्हा प्लांट गेल्या सहा महिन्यांतील नियोजित देखभालीचा (टर्नअराउंड) वेळ विचारात घेतात, तेव्हा काही युनिट्समधील प्रभावी पुरवठा ५० टक्क्यांपेक्षा कमी होतो असंही त्यांनी म्हटलं आहे. इंधनाची उपलब्धता कमी झाल्यामुळे प्लांटने युरियाचे उत्पादन अंदाजे ५०% ने कमी केले आहे. शिवाय ते कमी उत्पादन करण्यासाठी जास्त ऊर्जा वापरत आहेत. याचे कारण मोठी अमोनिया-युरिया प्लांट आहेत. जेव्हा ती त्यांच्या ऑप्टिमल क्षमतेपेक्षा कमी क्षमतेने चालतात, तेव्हा त्यांची कार्यक्षमता कमी होते. या आकाराचे प्लांट इच्छेनुसार उत्पादन वाढवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी बनवलेले नाहीत. अशा परिस्थितीत काम करणे म्हणजे कमी खत तयार करण्यासाठी जास्त ऊर्जा वापरणे. हे थेट आर्थिक नुकसान आहे असं एका प्लांट ऑपरेशन्स मॅनेजरच्या हवाल्याने सांगण्यात येत आहे.
किंमतींबाबतही अनिश्चितता
या व्यत्ययामुळे किंमतींबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. १५ मार्च रोजीच्या एका पत्रानुसार गेलने (GAIL) खत कंपन्यांना कळवले आहे की, ते आता दीर्घकालीन आरएलएनजी (RLNG) प्रमाणासाठी अनेक वेगवेगळ्या किंमतींवर बिल आकारतील. करारानुसार किंमत, गेलची एकत्रित किंमत आणि गॅझेटमधील एकत्रित किंमत. ही व्यवस्था १ मार्च २०२६ पासून प्रभावी होईल. तर १९ मार्चपर्यंत देशाचा युरियाचा साठा ६.११४ दशलक्ष टन होता, जो वर्षभरापूर्वी ५.५२२ दशलक्ष टन होता. यामुळे सध्या तरी काहीसा दिलासा मिळाला आहे.
Web Summary : Hormuz Strait disruption hits India hard. Gas shortages cripple urea production. Fertilizer supply chain suffers, threatening agriculture. Prices rise, uncertainty increases.
Web Summary : होरमुज जलडमरूमध्य व्यवधान से भारत बुरी तरह प्रभावित। गैस की कमी से यूरिया उत्पादन बाधित। उर्वरक आपूर्ति श्रृंखला प्रभावित, कृषि खतरे में। कीमतें बढ़ीं, अनिश्चितता बढ़ी।