शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

एक गाडी बाकी अनाडी; राष्ट्रपतींची १२ कोटींची कार म्हणजे जणू चमत्कार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2018 14:23 IST

आज भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा 73 वा वाढदिवस आहे. एका गावातून आलेले कोविंद आज 12 कोटींच्या कार मधून फिरत आहेत.

नवी दिल्ली : आज भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा 73 वा वाढदिवस आहे. 1 ऑक्टोबर 1945 मध्ये कोविंद यांचा जन्म कानपूरच्या एका छोट्याशा परौख या खेड्यात जन्म झाला. कायद्याची पदवी घेतल्यानंतर त्यांनी दिल्लीच्या उच्च न्यायालयामध्ये वकीली करण्यास सुरुवात केली. यानंतर ते काही वर्षे केंद्र सरकारचेही वकील म्हणून काम पाहिले. एका गावातून आलेले कोविंद आज 12 कोटींच्या कार मधून फिरत आहेत. ही देशातील सर्वात सुरक्षित आणि महागडी कार आहे. कोविंद जगात जेथे जेथे जातात ही कार सतत त्यांच्यासोबत असते. 

रामनाथ कोविंद यांनी 25 जुलै, 2017 मध्ये भारताचे राष्ट्रपती बनले. या पूर्वी ते बिहारचे राज्यपालही होते. कोविंद यांच्या सेवेसाठी असलेली कार ही साधीसुधी कार नसून अशाप्रकारची कार अमेरिकेचे अध्यक्षही वापरतात. जगविख्यात मर्सिडीज कंपनीची ही एस क्लास (एस 600) ही कार त्यांच्या दिमतीला भारत सरकारने ठेवलेली आहे. माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जीदेखील याच कारमधून प्रवास करत होते. ही कार जरी मर्सिडीज या कंपनीची असली तरीही ती लांबड्या लिमोझीनी कारसारखी दिसते. मर्सिडीज आणि मेबॅक या कंपन्यांनी मिळून जर्मनीमध्ये ही प्रशस्त आणि दणकट कार बनविली आहे. 

काय आहे खास...भारताचे राष्ट्रपती हे देशाचे प्रथम नागरिक आहेत. त्यांची सुरक्षा ही पंतप्रधानांपेक्षाही कडक असते. यामुळे कोणत्याही दौऱ्यावेळी त्यांच्यावर दहशतवादी हल्ला झाल्यास त्यांना काही होऊ नये म्हणून या कारची खास रचना केलेली आहे. एखाद्या हल्लामध्ये राष्ट्रपती जखमी झाल्यास त्यांच्यासाठी ऑक्सिजनची सोय, अंधारात सुखरूप मार्ग काढण्यासाठी मार्गदर्शक यंत्रणा, बॅलिस्टिक प्रोटेक्शन आणि ताज्या हवेची सोय या कारमध्ये करण्यात आली आहे. या शिवाय या कारवर बॉम्ब हल्ला झाल्यास आतील राष्ट्रपतींना धक्काही जाणवणार नाही. तसेच एकही गोळी आत शिरणार नाही याची खास व्यवस्था करण्यात आली आहे. म्हणजेच कारवर जर 0.44 कॅलिबरच्या बंदुकीची गोळी, मिलिटरी रायफल शॉट किंवा एखादे मिसाईल जरी आदळल्यास कारमधील व्यक्ती सुरक्षित राहणार आहे. 

या कारला पंक्चर होण्याचा धोकाही फार कमी आहे. जरी पंक्चर झाली तरीही ही कार काहीशे किमी वेगाने धावू शकते. याशिवाय या कारमध्ये सॅटेलाईट सह जॅमरचीही सुविधा देण्यात आली आहे. यामुळे राष्ट्रपती कोठूनही कुणाशीही बोलू शकतात. 

बॅलिस्टिक प्रोटेक्शन हे फिचर या कारला बुलेटप्रूफ बनविते. गॅस बॉम्बचा हल्ला झाल्यास राष्ट्रपतींना स्वच्छ हवा आणि ऑक्सिजनही लगेचच मिळू शकतो. 

 

इंजिनांचा बापमर्सिडीज S600 पुलमॅन गार्ड असे या कारचे नाव असून यामध्ये टर्बो V12 हे 530 बीएचपी आणि 830 न्युटन मीटर एवढा प्रचंड टॉर्क देणारे इंजिन बसविण्यात आले आहे. तसेच 4123 मिमीचा व्हीलबेस देण्यात आला आहे. कारमधील बसण्याची जागा आणि इंटेरिअरही अशा पद्धतीने केले आहे की कारबाहेरील विद्रोहींना न कळताच बैठकही घेतली जाऊ शकते.  

टॅग्स :Ramnath Kovindरामनाथ कोविंदcarकारBombsस्फोटके