शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

तेल आयात महागली; रुपया घसरल्यामुळे भारताला 26 अब्ज डॉलरचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2018 15:24 IST

2017 साली 220.43 मेट्रीक टन कच्चे तेल आयात करण्यासाठी देशाने 87.7 अब्ज डॉलर खर्च केले होते आता यावर्षी 227 मे. टन तेलाची गरज लागणार आहे

नवी दिल्ली-  गेले काही दिवस सतत घसरणाऱ्या रुपयाचा परिणाम आता भारताच्या तेल आयातीवर होणार आहे. दोन दिवसांपूर्वी रुपया डॉलरच्या तुलनेत 70.7 इतका घसरला होता. यामुळे आता भारताला 2018-19 या वर्षातील तेल आयातीसाठी 26 अब्ज डॉलर जास्त द्यावे लागणार आहेत.भारतात तेलाची म्हणजे इंधनाची गरज दिवसेंदिवस वाढत आहेत तसेच भारतातील 80 टक्के इंधन परदेशातून आयात करावे लागते. 2017 साली 220.43 मेट्रीक टन कच्चे तेल आयात करण्यासाठी देशाने 87.7 अब्ज डॉलर खर्च केले होते आता यावर्षी 227 मे. टन तेलाची गरज लागणार आहे. या सर्व तेलासाठी भारताला यंदा 108 अब्ज डॉलर्स म्हणजे 7.02 लाख कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. जगातील कोणत्या देशांची अर्थव्यवस्था तेलनिर्मिती आणि निर्यातीवर अवलंबून आहे?तेल हा ऊर्जानिर्मितीचा महत्त्वाचा स्रोत आहे हे आपल्याला माहीत आहेच. आज सौर, पवन असे ऊर्जानिर्मितीचे स्रोत तयार झाल् असले तरी तेलाचे स्थान अजूनही अबाधित आहे. जानेवारी २०१८ ची आकडेवारी पाहिल्यास तेल निर्यातीत सौदी अरेबियाचा पहिला नंबर लागतो. हा देश दररोज ९३ लाख बॅरल्स तेलाची निर्यात करतो. सौदी अरेबियापाठोपाठ अमेरिकेचा नंबर लागतो. अमेरिका दररोज ८३ लाख बॅरल्स तेल निर्यात करतो. त्यानंतर रशिया दररोज ७४ लाख बॅरल्स तेल निर्यात करतो. अमेरिकेने गेल्या काही वर्षांत आपले तेलउत्पादन वेगाने वाढवले आहे, हा वेग पाहाता २०१९ या वर्षी अमेरिका तेलनिर्यात करणारा सर्वात मोठा देश होण्याती शक्यता वर्तवली जात आहे.तेल उत्पादनात कोण आघाडीवर ?तेल उत्पादनाचा २०१७ च्या आकडेवारीनुसार विचार करता अमेरिका यामध्ये आघाडीवर असल्याचे दिसते. अमेरिकेने यावर्षी प्रतिदिन १ कोटी ४७ लाख बॅरल्स तेलाचे उत्पादन केले आहे. त्यानंतर रशियाने प्रतिदिन १ कोटी १३ लाख बॅरल्स आणि सौदी अरेबियाने प्रतिदिन ९९ लाख बॅरल्स तेलाचे उत्पादन केले आहे. त्यानंतर कँनडाने प्रतिदिन ४८ लाख बॅरल्स, इराकने ४७ लाख बॅरल्स प्रतिदिन तेल उत्पादित केले आहे.इराण ३८ लाख बॅरल्स प्रतिदिन, चीन ३७ लाख बॅरल्स प्रतिदिन, संयुक्त अरब अमिराती २९ लाख, ब्राझील २८ लाख, कुवेत २७, व्हेनेझुएला १९.७ लाख, नाँर्वे १९ लाख बॅरल्स प्रतिदिन एवढे उत्पादन करत २०१७ साली करत होते.

अर्थव्यवस्था तेलावर अवलंबून असणे म्हणजे काय ?केवळ तेलाचे उत्पादन किंवा निर्यात जास्त असणे म्हणजे त्या देशाची अर्थव्यवस्था तेलावर अवलंबून असते असे नाही. उदाहरणार्थ अमेरिका तेल उत्पादनात व निर्यातीत सतत पहिल्या दोन क्रमांकामध्ये असला तरी अमेरिकेची अर्थव्यवस्था तेलावर अवलंबून नाही. जर अर्थव्यवस्थेत सर्वात जास्त महसूल तेलातून येत असेल आणि जीडीपीचा सर्वात जास्त भार तेलावर असेल तर त्यास तेलावर आधारीत अर्थव्यवस्था म्हटले जाते. अमेरिका सध्या या स्थितीत नाही. 

मग तेलावर आधारीत देश आहेत तरी कोणते ? जागतिक बँकेच्या २०१२ सालच्या आकडेवारीनुसार विचार करता पुढील देशांची अर्थव्यवस्था तेलावर आधारीत असल्याचे दिसते. कुवेत लिबियासौदी अरेबियाइराकअंगोलाओमानअझरबैझानव्हेनेझुएलाचाडब्रुनेईकझाखस्तानइराणसंयुक्त अरब अमिरातीबाहरिनइक्वेडोर

टॅग्स :Crude Oilखनिज तेलIndiaभारत