बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांनी भारताबाबत एक वादग्रस्त विधान केले आहे. या विधानावरुन आता भारताच्या राजनियकांनी इशारा दिला आहे. चीनमध्ये मोहम्मद युनूस म्हणाले की, भारताची ७ सिस्टर्स राज्ये म्हणजेच ईशान्येकडील राज्ये समुद्राने वेढलेली आहेत. आपण या संपूर्ण प्रदेशासाठी महासागराचे एकमेव संरक्षक आहोत.
या विधानावर, बांगलादेशातील माजी भारतीय राजदूत वीणा सिक्री यांनी बांगला देशावर टीका केली. जर बांगलादेश अशा प्रकारे आपला अहंकार दाखवत असेल तर त्या बदल्यात बांगलादेशनेही भारताकडून नदी आणि किनाऱ्यावरील हक्क मागू नयेत, असं ते म्हणाले.
उपस्थित रहा...! बुधवारी लोकसभेत सादर होणार वक्फ विधेयक, भाजपनं खासदारांना जारी केला व्हिप
बांगलादेशातील माजी भारतीय उच्चायुक्त वीणा सिक्री यांनी सांगितले की, "मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांचे विधान खूपच धक्कादायक आहे. त्यांना असे विधान करण्याचा कोणताही अधिकार नाही. त्यांना माहिती आहे की ईशान्य हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि ईशान्य भारतातून बंगालच्या उपसागरात प्रवेश करण्याबाबत आमची बांगलादेश सरकारशी खूप जवळून चर्चा झाली आहे आणि यावर औपचारिक करार देखील झाले आहेत. वीणा सिक्री म्हणाल्या की, आपण या विधानाचा निषेध केला पाहिजे आणि मी बांगलादेशला एक गोष्ट अगदी स्पष्टपणे सांगू शकते की जर त्यांना ईशान्य भारताला कनेक्टिव्हिटी अधिकार देण्यात रस नसेल, तर ते किनारी क्षेत्र म्हणून कोणत्याही अधिकारांची अपेक्षा करू शकत नाहीत. म्हणून त्यांनी याबद्दल स्पष्टपणे कोणताही भ्रम बाळगू नये."
माजी राजनयिक वीणा सिकरी यांचा रोख ब्रह्मपुत्रा नदीबाबत होता. बांगलादेशने ब्रह्मपुत्रा नदीच्या पाण्याचा प्रश्न भारतासमोर वारंवार उपस्थित केला आहे. यापूर्वी अनेक वेळा त्यांनी भारताकडे पाणी न सोडल्यामुळे किंवा कधीकधी कोणतीही पूर्वसूचना न देता पाणी सोडल्यामुळे आलेल्या पुरांबद्दल तक्रार केली आहे.