शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

अग्नी 5 लवकरच सैन्याच्या ताफ्यात; संपूर्ण चीन आता भारताच्या टप्प्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2018 18:29 IST

अग्नी 5 ची मारकक्षमता तब्बल 5 हजार किलोमीटर आहे

नवी दिल्ली : लवकरच भारतीय सैन्याच्या ताफ्यात सर्वात शक्तीशाली क्षेपणास्त्राचा समावेश आहे. आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र अग्नी-5 सुरक्षा दलांच्या ताफ्यात येताच भारताचं सामर्थ्य कित्येक पटींनी वाढेल. अग्नी 5 ची मारक क्षमता तब्बल 5 हजार किलोमीटर इतकी आहे. त्यामुळे संपूर्ण चीन भारताच्या टप्प्यात येईल. चीनच्या कोणत्याही भागाला लक्ष्य करण्याची क्षमता अग्नी 5 मध्ये आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 5 हजार किलोमीटरची मारक क्षमता असलेली अग्नी 5 ही क्षेपणास्त्र प्रणाली अण्वस्त्रदेखील वाहून नेऊ शकते. लवकरच अग्नी 5 स्ट्रॅटर्जिक फोर्सेस कमांडकडे सुपूर्द करण्यात येईल. देशातील अत्यंत आधुनिक क्षेपणास्त्र स्ट्रॅटर्जिक फोर्सेस कमांडकडे सोपवली जातात. मात्र याआधी अग्नी 5 च्या विविध चाचण्या घेतल्या जात आहेत. सुरक्षा क्षेत्रातील जाणकारांच्या माहितीनुसार, पेइचिंग, शांघाय, गुआंगझाऊ या शहरांसह चीनमधील कोणत्याही भागाला अग्नी 5 च्या माध्यमातून लक्ष्य केलं जाऊ शकतं.गेल्या महिन्यात ओडिशाच्या किनारपट्टीवरुन अग्नी 5 ची यशस्वी चाचणी करण्यात आली होती. अग्नी 5 स्ट्रॅटर्जिक फोर्सेस कमांडकडे सोपवण्याआधी अशा आणखी काही चाचण्या घेतल्या जाणार आहेत. पुढील काही आठवड्यांमध्ये या चाचणी घेतल्या जातील. अग्नी 5 मुळे देशाच्या युद्धसज्जता कित्येक पटीनं वाढेल, असा विश्वास एका उच्चपदस्थ अधिकाऱ्यानं व्यक्त केला. 'अग्नी 5 मधील नेव्हिगेशन यंत्रणा अतिशय अत्याधुनिक आहे. याशिवाय याची क्षमतादेखील इतर क्षेपणास्त्र प्रणालींपेक्षा कित्येक पटीनं जास्त आहे,' अशी माहिती या अधिकाऱ्यानं दिली.  

टॅग्स :Indiaभारतchinaचीन